चायनीज खाता की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:33 AM2021-09-22T04:33:17+5:302021-09-22T04:33:17+5:30
हिंगोली: गत काही वर्षांपासून चायनीज पदार्थ खाण्याचे प्रमाण शहराच्या ठिकाणी वाढलेले पहायला मिळत आहे. विरंगुळा म्हणून पदार्थ खाल्ले ...
हिंगोली: गत काही वर्षांपासून चायनीज पदार्थ खाण्याचे प्रमाण शहराच्या ठिकाणी वाढलेले पहायला मिळत आहे. विरंगुळा म्हणून पदार्थ खाल्ले तर ते काही वाईट नाही,परंतु नेहमीच जर चायनीज खाल्ले तर आजारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. तेव्हा चायनीजपासून सावध रहावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
सद्य:स्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर खाणे हे टाळलेच पाहिजेत. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणतेही जड पदार्थ हे व्यवस्थितरित्या पचत नाहीत. तिखट व जड पदार्थ खाणे टाळल्यास प्रकृती चांगली राहते. हलके पदार्थ खाण्याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
काय आहे अजिनोमोटो?
तयार केलेल्या चायनीज पदार्थाला चव यावी म्हणून त्यात अनेक जण ‘अजिनोमोटो’ हे टाकतात. भाजीला चव येऊन तेवढ्या पुरते बरे वाटते. चायनीज पदार्थ चांगले असतात हेही कळायला लागते. परंतु, यामुळे पोटाच्या कॅन्सरची शक्यता जास्त असते, हे लक्षात ठेवायला पाहिजे.
...म्हणून चायनीज खाणे टाळा
चायनीज पदार्थामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा मारा जास्त केला जातो. एवढेच काय मिठाचे प्रमाणही जास्त असते. यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामनाही करावा लागतो. तेव्हा मोठ्या व्यक्तीने स्वत:ची काळजी घेत लहान मुलांचीही काळजी घ्यावी. कारण मोठ्याचे अनुकरण लहान मुले करत असतात.
प्रतिक्रिया...
तिन्ही ऋतुंमध्ये हलके पदार्थ खाऊन प्रकृती चांगली ठेवावी. चायनीज पदार्थ खाण्यासाठी बरे वाटतात, परंतु या पदार्थामध्ये ‘अजिनोमोटो’ मिसळून पदार्थाला चव आणली जाते. या प्रकारामुळे रक्तदाब, पोटाचा कॅन्सर तसेच इतर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते. तेव्हा हे चायनीज पदार्थ खाण्याचे टाळावे.
-डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी