‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:14+5:302021-07-27T04:31:14+5:30
प्रतिक्रिया... रितसर नोंदणी सुरू वधू, वर, पुरोहित, तीन साक्षीदारांच्या साक्षीने नगर परिषदेमध्ये रितसर नोंदणी केली जाते. कोरोना काळामध्ये नोंदणी ...
प्रतिक्रिया...
रितसर नोंदणी सुरू
वधू, वर, पुरोहित, तीन साक्षीदारांच्या साक्षीने नगर परिषदेमध्ये रितसर नोंदणी केली जाते. कोरोना काळामध्ये नोंदणी कमीच झाली आहे. जानेवारी २०२१ पासून नोंदणी वेळेवर होत आहे.
-डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी.
प्रतिक्रिया...
मुलीला सरकारी नोकरीवाला नवरदेव पाहिजे असल्यामुळे खासगी दुकानात किंवा कंपनीत काम करणाऱ्यास वधूचे पिता पसंती देत नाहीत. त्यामुळे आज पाच वर्षांपासून माझे लग्न राहिले आहे, अशी प्रतिक्रिया एका
बाशिंग बांधलेल्या नवरदेवाने
दिली.
प्रतिक्रिया..
लग्न करण्याची खूप इच्छा आहे. वय पण वाढत चालले आहे; पण मुलगी काही कोणी देत नाही. लग्न कधी होते? जोडप्याने फिरायला कधी जाणे होते? असे प्रश्न पुढे येतात. लग्न होण्यासाठीच मी आता सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहे, अशी प्रतिक्रिया एका मुलाने दिली.