चुंचा ग्रा.पं.त गैरव्यवहाराचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:03 AM2018-11-23T00:03:47+5:302018-11-23T00:04:19+5:30

कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या वापरात अनियमितता व प्रशासकीय नियम धाब्यावर बसून त्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर ठपका ठेवत कारवाई करण्याची सूचना या चौकशी अहवालात देण्यात आली आहे.

 Chukra Grampanchayat's scandal | चुंचा ग्रा.पं.त गैरव्यवहाराचा ठपका

चुंचा ग्रा.पं.त गैरव्यवहाराचा ठपका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या वापरात अनियमितता व प्रशासकीय नियम धाब्यावर बसून त्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर ठपका ठेवत कारवाई करण्याची सूचना या चौकशी अहवालात देण्यात आली आहे.
कळमनुरी तालुक्यातील चुंचा ग्रामपंचायत वादाच्या भोवºयात सापडली आहे. येथे आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. २७ लाख ५७ हजार ४३७ रुपये हा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला होता. परंतु त्याचा विनियोग नियमाप्रमाणे करण्यात आला नसल्याचे चौकशी अहवालात सिद्ध झाले आहे. २०१५-१६ यावर्षी ५ लाख ९८ हजार ०२५ रक्कमेमधून तत्कालीन ग्रामसेवक यू.टी. आडे व सरपंच सुरेखा सुरेश इंगोले यांनी हातपंप दुरूस्ती भरणा १० हजार रुपये एवढाच खर्च केल्याचे दिसते. उर्वरित ५ लाख ८८ हजार रुपयांचे पाणीपुरवठ्याचे काम व फर्निचर खरेदी केल्याचे कोणतेही अभिलेखे पहावयास मिळाले नाहीत. तसेच सदरील कामाचे अंदाजपत्रकही पहावयास मिळाले नाही. झालेल्या कामाचे अंदाजपत्रक, कामाचे मूल्यांकन, अंतिमीकरण, ग्रामपंचायत ठराव यांचे अभिलेखे चौकशीसाठी मिळाले नाहीत. त्यामुळे सदर रक्कमेची अनियमितता केल्याचे आढळून आले. २०१६-१७ मध्ये अग्रीममधून शाळेच्या कंपाऊंड वॉलचे गेट बसविणे, तांड्यामध्ये पाण्याच्या टाकी बांधकाम, दलित वस्तीमध्ये पाणीपुरवठा व आॅपरेटर मानधन इत्यादी कामे प्रस्तावित केल्याचे दिसले, परंतु एलईडी लाईट बसविण्याबाबत ग्रामपंचायत व प्रोसिडींगला ठराव न घेता परस्पर प्रस्तावित केल्याचे सिद्ध झाले. एलईडी लाईट बसविण्यासाठी निविदा न काढणे, ठराव न घेणे, ई टेडरींग न घेणे अशी प्रक्रिया अंमलात आणलेली नाही.
सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक बी.पी. कुटे यांनी एलईडी बसविण्याचे शर्ती अटीचे पालन न करता लाईट बसविण्यासाठी पौर्णिमा इलेक्ट्रिकल्स यांना ३ लाख ९९ हजार ३८९ रुपयांचा परस्पर धनादेश देऊन कर्तव्यात कसूर केला आहे. तर २०१६-१७ मध्ये १४ व्या वित्त आयोगातून ९ लाख १८ हजार २४७ रुपयांचे कामे केलेली असून कामाचे अंदाजपत्रक, मूल्यांकन, अंतिमीकरण झालेले आहे. परंतु ग्रामपंचायतीची प्रशासकीय मान्यता, कृती आराखडा ठराव व जमाखर्चास मान्यता घेतलेली दिसून येत नाही. ही बाब कर्तव्यात कसूर करणारी आहे. असा ठपका ग्रामसेवक ए.आर. मुंढे यांच्यावर करण्यात आलेला आहे. कळमनुरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी यांनी या चौकशीत ग्रामसेवक ए.आर. मुंढे, ग्रामसेवक बी.पी. कुटे, ग्रामसेवक यू.टी. आडे व सरपंच सुरेखा सुरेश इंगोले यांनी पदाचा दुरूपयोग करून हा आर्थिक अनियमिततेचा कट रचून तो यशस्वी केला असल्याचा ठपका कळमनुरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी यांनी ठेवला आहे.
यात ते दोषी आढळले असल्याने ३ ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करण्याबाबत सुचित केले आहे.
दरम्यान, चुंचा येथील ग्रामसेवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकारही चर्चेत आला आहे. वारंगा फाटा येथे हा ग्रामसेवक आढळला होता. ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाºयांनी संबंधितास खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले जाते.

Web Title:  Chukra Grampanchayat's scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.