शहराची स्वच्छतेकडे वाटचाल, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:37 PM2019-02-02T23:37:56+5:302019-02-02T23:40:34+5:30

शहर स्वच्छतेकडे पाऊल टाकत असले तरी, पूर्णपणे शहरातील घाण अद्याप साफ झाली नाही. शहरात सध्या पालिकेकडून स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे.

 City moves towards cleanliness, but ... | शहराची स्वच्छतेकडे वाटचाल, पण...

शहराची स्वच्छतेकडे वाटचाल, पण...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहर स्वच्छतेकडे पाऊल टाकत असले तरी, पूर्णपणे शहरातील घाण अद्याप साफ झाली नाही. शहरात सध्या पालिकेकडून स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे. कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावणे, दरदिवशी प्रत्येक प्रभागातील घरोघरी घंटागाडी पोहचत आहे. मात्र अद्याप काही भागातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे.
हिंगोली नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहरस्वच्छतेवर मुख्याधिकारी भर देत आहेत. प्रत्येक्ष पाहणी करणे, सफाई कर्मचाºयांच्या अडचणी जाणून घेणे, स्वच्छतेसाठी असलेल्या घंटागाडी तसेच इतर वाहने यावर त्यांचे नियंत्रण असते. परंतु हिंगोली शहर खरच स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे का? असा प्रश्नही कधी-कधी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. शहरातील जुने शासकीय रूग्णालय, भाजीमंडई, जुने ग्रामीण पोलीस ठाणे, जवाहर रोड या ठिकाणी असलेल्या कचराकुंड्यातील कचºयाची वेळेवर कधीच विल्हेवाट लावली जात नाही. सध्या कचराकुंडीमुक्त शहर करण्याचा निश्चय पालिकेने घेतला असल्याने आता कुंड्या दिसत नाहीत. घरपर्यंत घंटागाडी पोहचत असल्याने त्यातच कचरा टाकला जात आहे. परंतु शहरातील अनेक ठिकाणचा कचरा हा जाग्यावरच कुजत आहे. हिंगोली शहरात ज्या ठिकाणी कुंड्या आहेत त्यातील कचºयाची वेळेत विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, परिसरातील अस्वच्छतेने कळस गाठला आहे.
कचरा अस्ताव्यवस्त असल्याने त्यावर गुरांचा संचार असतो. असे चित्र अजूनही काही भागात आहे. मात्र हे चित्र बदलू लागले आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये हिंंगोली पालिकेने सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे. उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाºयांचा सन्मान केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे थोडेफार शिस्तीकडे झुकलेले शहर पुन्हा पहिल्या मार्गाने जाण्याची भीती आहे.
हिंगोली येथील स्वच्छता अभियानाला गती आल्यानंतर शहरात काही दिवस सर्वच रस्ते अगदी चकाचक दिसत होते. आता मुख्य काही रस्ते साडले तर कचरा साठलेला रस्ताच सापडत नाही. विशेष म्हणजे शहराचा कचरा उचलण्यावरील खर्चात चार ते पाचपट वाढ झाली अन् कचरा मात्र जागीच आहे. घंटागाड्यांतून जाणारा कचरा तेवढा थेट बाहेर जातो. मात्र पालिकेच्या कल्पाण मंडपम्मध्ये हिंगोली नगरपालिका असे नाव टाकून तब्बल ९ घंटागाड्या धूळखात उभ्या आहेत. लाखोंचा खर्च करूनही या गाड्या जागीच का उभ्या आहेत, याची माहितीही कुणी द्यायला तयार नाही. तर कचराच उचलला जात नसल्याने काही जणांनी कचराकुंड्या रिकाम्या करून याच वाहनांजवळ आणून टाकल्या. त्यांचीही संख्या दहा ते बारा एवढी आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर नियंत्रण नाही अन् यंत्रणेचाही योग्य वापर नाही, असे चित्र निर्माण झाले.

Web Title:  City moves towards cleanliness, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.