दोन गटांत हाणामारी; १० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:45 AM2018-06-10T00:45:26+5:302018-06-10T00:45:26+5:30
येथे दोन गटांतील वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने परस्परविरोधी तक्रारींवरून हट्टा पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : येथे दोन गटांतील वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने परस्परविरोधी तक्रारींवरून हट्टा पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश सखाराम शेळके (रा. पोटा) यांनी फिर्याद दिली की, बाजार समितीच्या आवारामध्ये अवैध वाळूसाठा केला. याबद्दलची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे का केली, असे म्हणून आरोपीने थापडबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांत नोंद केले आहे. यावरून आरोपी शंकर रंगनाथ कदम, संजय रंगनाथ कदम (रा.नालेगाव), गोविंद पांडुरंग राखोंडे (जवळा बाजार) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसºया गटात शंकर रंगनाथराव कदम (रा. नालेगाव) यांच्या फिर्यादीवरून आरोपींनी साथीदार जमवून आमच्या राहत्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून हातामध्ये काठ्या लोखंडी रॉड घेऊन, तू आमचे गावातील लोकांना नेहमी मदत का करतोस, या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. घरातील खुर्ची व काचेचा टीपॉय तोडून नुकसान केले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला. यामध्ये आरोपी सुरेश गणेशराव आहेर, गोविंद सुरेश आहेर, आदित्य प्रताप आहेर, मनोज सुरेश आहेर रा. आजरसोंडा, रमेश सखाराम शेळके, बालाजी मगर, केदारनाथ रमेश शेळके यांच्याविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.