सुकळी गावात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:40 AM2018-10-10T00:40:14+5:302018-10-10T00:40:37+5:30
वसमत तालुक्यातील सुकळी येथे महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत गावातील महिला गटांना संघटीत करुन छत्रपती शिवाजी महाराज महिला महामंडळाची स्थापना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदा : वसमत तालुक्यातील सुकळी येथे महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत गावातील महिला गटांना संघटीत करुन छत्रपती शिवाजी महाराज महिला महामंडळाची स्थापना केली. या महासंघाच्या वतीने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता केली.
सुकळी येथे सोमवारी महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत वर्धिनी अल्फा नगराळे, स्वाती मस्के, माधुरी कांबळे, सरपंच शेषीकला बारकर, पो. पाटील अनील इंगोले, तंटामुक्त अध्यक्ष साहेबराव अंभोरे, अंगणवाडी सेविका अनिता नरवाडे, त्रिशलाबाई नरवाडे यांच्या उपस्थितीत सर्व महिला गटांना संघटत करुन छत्रपती शिवाजी महाराज महिला ग्रामसंघाची स्थापना केली. या मोहीमेअंतर्गत दससुत्री कार्यक्रमा विषयी माहिती देण्यात आली. महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या उपकमाच्या माध्यमातून गावातील साडेतीनशे महिलांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला. गावात स्वच्छता मोहीम यशस्वी राबवली. हा उपक्रम राबवीण्याकरीता गावातील अंगणवाडीसेविका, आशा, महिला बचतगट यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.