हिंगोलीत नगरपालिकेतर्फे स्वच्छतेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:54 AM2018-09-18T00:54:30+5:302018-09-18T00:55:08+5:30

नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरातील अग्रसेन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आला.

 Cleanliness initiative by Hingoli municipality | हिंगोलीत नगरपालिकेतर्फे स्वच्छतेचा उपक्रम

हिंगोलीत नगरपालिकेतर्फे स्वच्छतेचा उपक्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरातील अग्रसेन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आला.
केंद्र शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जिल्हाभर प्रशासनाने नियोजन केले आहे. यासाठी शहरी भागात नगरपालिका तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी नियोजन करायचे आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी एका अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. हिंगोली नगरपालिकेनेही आज शहरात हा उपक्रम राबविला. अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्याची साफसफाई करण्यात आली. काही ठिकाणी रस्त्यालगतची झुडपेही काढली. या भागात काही दुकानदार व विक्रेत्यांनी टाकलेला कचरा त्यांना स्वत: साफ करायला लावला. विशेष म्हणजे काहींनी पालिकेची सफाई मोहीम पाहून तेथे कचरा आणून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अशांना कचरा ट्रॅक्टरपर्यंत नेवून टाकायला लावण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रामदास पाटील, बाळू बांगर, महिला बचत गटाच्या सदस्या, नगरपालिका कर्मचाºयांचीही उपस्थिती होती.

Web Title:  Cleanliness initiative by Hingoli municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.