महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:45 AM2018-10-03T00:45:34+5:302018-10-03T00:46:06+5:30
राष्टÑपिता महात्मा गांधी यांची जयंती २ आॅक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रॅलीचा समारोप झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्टÑपिता महात्मा गांधी यांची जयंती २ आॅक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रॅलीचा समारोप झाला.
यावेळी परिसरातील केर-कचरा उचलून साफसफाई केली. स्वच्छता अभियानात आ. तान्हाजी मुटकुळे, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, वीरकुंवर अण्णा, मिलींद यंबल, दुर्गादास साकळे, संतोष टेकाळे, शरद जैस्वाल, फुलाजी शिंदे, कैलास काबरा, उमेश गुट्टे, प्रशांत सोनी, हमिद प्यारेवाले, क्रिश्ना रुहाटिया यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेत पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांची जयंती स्वच्छता दिवस म्हणून देशभर साजरी करण्यात आली. हिंगोली शहरातील अनेक ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढिगारे उचलून स्वच्छता करण्यात आली. महात्मा गांधी यांचे स्वच्छते बाबतचे विचार सर्व जनतेपर्यंत पोहचावे यासाठी भाजपाकडून पायदळ दिंडी काढण्यात येणार आहे. स्वच्छतेबाबत जागर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुख्य मार्गावरून स्वच्छता रॅली काढण्यात आली. विविध भागात कचरा उचलला. राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.
मुटकुळे खवळले...
यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी शहरातील स्वच्छतेबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांनी उपाययोजना करून विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले. तर शहर स्वच्छतेबाबत संबंधित ठेकदारांची कानउघाडणी करावी, अशीही सूचना आ. मुटकुळे यांनी पालिका प्रशासनाला केली. तर नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी शहरातील कचºयाचे ढिगारे जमा होणार नाहीत, तसेच संबंधित ठेकेदारांना तशी ताकीद देऊन शहरातील स्वच्छतेबाबत वेळोवेळी दखल घेतली जाईल, असे सांगितले. नागरिकांनीही कचरा पालिकेच्या कुंड्यातच कचरा टाकावा, असे आवाहनही नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी यावेळी केले.