‘त्या’ ४० गावांचा पीकविमा भरण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:43+5:302021-07-15T04:21:43+5:30
सध्या खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याची घाई केली होती. परंतु हिंगोली जिल्ह्यातील ४० गावांची नावे ...
सध्या खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याची घाई केली होती. परंतु हिंगोली जिल्ह्यातील ४० गावांची नावे पीकविम्याच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये दाखवत नसल्याने या गावातील शेतकरी बांधव हवालदिल झाले होते. पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि संबंधित पीकविमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यांनतर तत्काळ यावर कारवाई केली. चारही तालुक्यातील गावांचा पीकविमा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या गावांचा समावेश ऑनलाइन प्रणालीमध्ये करण्यात आला नव्हता, त्यामध्ये हिंगोली तालुक्यातील गणेशवाडी, झुलुका, जांभरून जहांगीर, जांबवाडी, डोंगी, दुधेरी, धोतरवाडी, बुकनवाडी, मल्हारवाडी, राजवाडी, वंजारवाडी, ससेवाडी, सिंगारवाडी, हिंगोली, (MCI) जऊळका, भुली, घोगरतळा, गाडीबोरी, सेनगाव तालुक्यातील बरडा, कारला, मकोडी, मांगनवाडी, वसमत तालुक्यातील रुखी, आंबा, मुरुंबा खु., आमनाथ, संगमेश्वर, भाटेगाव, रेऊळगाव, चिंचोलीतर्फे माळवटा, कळमनुरी तालुक्यातील गणगाव, खारवी, रहेमापूर, कृष्णापूरतर्फे जवळा, देवदरी, धुमका, गारोळ्याची वाडी, वसपांगरा, चिंचोर्डी ही गावे आहेत.