सामूहिक विवाह सोहळा थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:19 AM2018-05-08T00:19:58+5:302018-05-08T00:19:58+5:30

आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या पावनभूमीमध्ये नागनाथ संस्थानच्या वतीने परिसरातील आठ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात झाला. गावातून वधू-वरांची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरले.

 In the collective marriage ceremony | सामूहिक विवाह सोहळा थाटात

सामूहिक विवाह सोहळा थाटात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या पावनभूमीमध्ये नागनाथ संस्थानच्या वतीने परिसरातील आठ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात झाला. गावातून वधू-वरांची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरले.
धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे सूचनेवरून नागनाथ संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या पुढाकारातून ८ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. संस्थानकडून वºहाडी मंडळीची व्यवस्था, वधू-वरांना संसारोपयोगी वस्तू, मान्यवरांची उपस्थिती यामध्ये खा. अ‍ॅड. राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफे, संस्थान सल्लागार शिवाजी देशपांडे, डॉ. विलास खरात, आनंद निलावार, पंजाब गव्हाणकर, विश्वस्त गजानन वाखरकर, डॉ. किशन लखमावार, रमेशचंद्र बगडिया, अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर, अ‍ॅड. राजेंद्र अग्रवाल, डॉ. पुरूषोत्तम देव, प्रा.देवीदास कदम, गणेश देशमुख, विद्या पवार, महेश बियाणी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव विरकुंवर अण्णा, ज्ञानेश्वर जाधव, पांडुरंग पाटील, नगराध्यक्षा दीपाली पाटील, उपनगराध्यक्षा अलका कुरवाडे, बाबुराव पोले, नगरसेवक सुमेध मुळे,विष्णू जाधव, बाळू देशमुख राधीका तुरूकधाडे, शाम गिरी महाराज, वैजनाथ पवार, बंडू काळे, पत्रकार, गणमान्य मंडळी आदींची उपस्थिती होती. अग्रवाल महिला मंडळाकडून नव दाम्प्त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या ८ जोडप्यांमध्ये ज्ञानेश्वर आश्रोबा सानप (रा.बरडा) यांचा विवाह आशामती शिवाजी मुंढे (रा.सावरगाव), अंकुश रामजी गाढवे (रा.फाळेगाव)- रेणुका गणेश खोकले (जलालदाभा), शिवाजी कुंडलिक कºहाळे (धानोरा)-रेखा गणेश खोकले (जलालदाभा), श्याम सोपान घाटोळ (टाकळगव्हाण)- लिंबाबाई गंगाराम रणखांबे (औंढा ना.), कैलास सुदाम सरोदे (सोमेश्वर)- रेखा शिवाजी कदम (चिंचोली), बाबु सखाराम पाचपुते (सिरळी)- योगीता मोतीराम वाबळे (बोरजा), प्रमोद परसराम पोफळकर (कोलवड, ता.जि.बुलडाणा)- अंजना नागनाथ तामसकर (औंढा ना.), तुकाराम प्रल्हाद गोरे (बळेगाव)- ताई भगवान सारंग (हयातनगर) या नववधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटात संपन्न झाला.

Web Title:  In the collective marriage ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.