बालभवन केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:19 AM2018-10-14T00:19:53+5:302018-10-14T00:20:56+5:30
शहरातील जि. प. कन्या प्रशालेतील बालभवन विज्ञान केंद्रास शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी धावती भेट दिली. विविध वैज्ञानिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील जि. प. कन्या प्रशालेतील बालभवन विज्ञान केंद्रास शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी धावती भेट दिली. विविध वैज्ञानिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी घेतली.
हिंगोली येथील जि. प. कन्या प्रशाला येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बालभवन विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रास हिंगोली तालुक्यातील शाळांची दरदिवशी नियोजित भेट ठरलेली असते. शुक्रवारी वडद येथील विद्यार्थी भेट देण्यासाठी आले होते. यावेळी जागतिक अंडी दिनानिमित्त प्रशालेत विद्यार्थ्यांना अंडी व केळी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरम्यान जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, गणेश वाघ, जिल्हा पशुवैद्यकीय उपायुक्त एल. एस. पवार, जिल्हा आरोग्याधिकारी शिवाजी पवार आदींनी केंद्रास धावती भेट दिली. यावेळी बालभवनाचे कार्य, त्यातील साहित्य व नियोजनाबद्दल जिल्हाधिकाºयांनी माहिती कार्यप्रवर्तक नितीन मोरे यांच्याकडून विचारून घेतली. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून प्रस्तुत उपक्रमातील अंधश्रद्धा निर्मुलन, भीती घालविणे, पदार्थ विज्ञातील अमूर्त संकल्पना, विद्युत उर्जा निर्मितीचे विविध स्त्रोत व त्याचे साहित्य प्रात्येक्षिकरूपात पाहिल्यावर कार्यप्रवर्तक नितीन मोरे यांचे अधिकाºयांनी कौतुक केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक गजानन गुंडेवार, पंडित अवचार, रामप्रकाश व्यवहारे, गंगाधर सानप, संजय साहू, वसंत कावरखे, सुरेश भालेराव, बळीराम राठोड हजर होते.