हिंगाेलीत कोविड लसची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:27+5:302021-01-09T04:24:27+5:30
कोविड लसच्या रंगीत तालीम सर्वप्रथम पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांनी प्रथम लस घेणाऱ्यांचे सॉप्टवेअर नोंदणीप्रमाणे पॅनकार्ड पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना कोविन ...
कोविड लसच्या रंगीत तालीम सर्वप्रथम पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांनी प्रथम लस घेणाऱ्यांचे सॉप्टवेअर नोंदणीप्रमाणे पॅनकार्ड पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना कोविन ॲपमध्ये नोंदणी करत लस देण्यात आली. शुक्रवारी ड्राय रनमध्ये एकूण २५ जणांना लस देण्यात आली. यांना नंतरचे लसीकरण सत्र हे शासनाच्या आदेशानुसार वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. लस देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली अर्धा तास ठेवण्यात आले. दरम्यान त्यांचे पल्स, ऑक्सिजन, बी.पी, शुगर इत्यादी चाचण्या करण्यात आली. या तपासणीत त्यांना कोणताही त्रास नसल्याची खात्री करून त्यांना घरी पाठविण्यात आले. तसेच लसीकरणाच्या लाभ घेतलेल्या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक मोबाइल नंबरवर त्यांचे लसीकरण यशस्वीरीत्या झाल्याचा संदेश कोविन ॲपद्वारे पाठविण्यात येणार आहे.
याप्रसंगी डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. रवींद्र जायभाये, डॉ. दीपक मोरे, डॉ. अजहर देशमुख, डॉ. इनायततुला खान, रेवती पिंपळगावकर, डॉ. नविद अथर, ज्योती पवार, सय्यद इम्रान अली, भीमराव खेबाळे व आशासेविकांची उपस्थिती होती. कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले.