अतिक्रमण हटवण्याचा आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:35 AM2018-03-06T00:35:40+5:302018-03-06T00:35:43+5:30

शहरात नगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तेवर झालेली अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनीही आता दिले आहेत. मात्र अद्याप मुख्याधिकारी व न.प.प्रशासनाने या आदेशाची साधी दखलही घेतली नसल्याचे चित्र आहे. उलट शहरात सर्वत्र अतिक्रमणे पुन्हा झपाट्याने वाढत आहेत.

 Commissioner's orders to delete encroachment | अतिक्रमण हटवण्याचा आयुक्तांचा आदेश

अतिक्रमण हटवण्याचा आयुक्तांचा आदेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : शहरात नगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तेवर झालेली अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनीही आता दिले आहेत. मात्र अद्याप मुख्याधिकारी व न.प.प्रशासनाने या आदेशाची साधी दखलही घेतली नसल्याचे चित्र आहे. उलट शहरात सर्वत्र अतिक्रमणे पुन्हा झपाट्याने वाढत आहेत.
वसमत नगरपालिकेच्या मालकीच्या जागा, संपादित जागा, मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली. संपादित जमिनीवर विनापरवाना बांधकामेही उभी राहत आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी प्रचंड मेहनत घेऊन काढलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहत आहेत. रस्त्यांवर टपºया, गाडे, हातगाडे उभे राहत आहेत. अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा सचिव बालाजी बोल्लेवार यांनी करून उपोषणही केले होते. मुख्याधिकाºयांनी त्यांना लेखी आश्वासन देऊन त्वरित अतिक्रमण काढण्यात येईल, असे पत्र दिले होते. या पत्राद्वारे शहरात न.प.च्या मालमत्तांवर अतिक्रमण आहेत. हेच स्पष्ट झाले होते.
बोल्लेवार यांनी मुख्याधिकाºयांचे आश्वासन व अतिक्रमण हटावची मागणी करणारे निवेदन विभागीय आयुक्तांना पाठवले होते. आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून त्वरित कारवाई करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाºयांनी मुख्याधिकाºयांना पत्र देवून कारवाई करण्याचे सुचित केले. मात्र अद्याप अतिक्रमण हटवण्यासाठी मुख्याधिकाºयांनी कोणतीच हालचाल केलेली नाही. नगरपालिकेच्या समोरच मोठमोठी अतिक्रमणे उभी राहिली तरीही मुख्याधिकारी कारवाई करत नाहीत. सर्व्हे नं. १५०, १८०, १८५ व इतर मालमत्तांचा वादही कायम धुमसत आहे. या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी बोल्लेवार यांनी केली आहे.
यापूर्वी जमीनदोस्त केलेले अतिक्रमणे तर पुन्हा उभी राहत आहेतच शिवाय रस्त्यांच्या दुतर्फाही रहदारी ठप्प करणारे अतिक्रमणे वाढतच आहेत. नगरपालिकेला वाढत्या अतिक्रमणांचे काही सोयरसुतक दिसत नसल्याचेच चित्र आहे.

Web Title:  Commissioner's orders to delete encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.