विद्युतीकरणावर व्यर्थ खर्च केल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:54 AM2019-01-12T00:54:04+5:302019-01-12T00:54:20+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात सुस्थितीत असलेली विद्युत उपकरणे काढून तेथे गरज नसताना विद्युतीकरण होत आहे. यामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी होत असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी कार्यकारी अभियंता औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील ग्रामीण रुग्णालयात सुस्थितीत असलेली विद्युत उपकरणे काढून तेथे गरज नसताना विद्युतीकरण होत आहे. यामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी होत असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी कार्यकारी अभियंता औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आहे. या इमारतीला काही दिवसांपूर्वी उच्च दर्जाचे विद्युतीकरण केले होते. ही उपकरणे बदलण्याची गरज नसतांना त्याचे परिक्षण न करता पैशाचा अपव्यय करुन उपकरणे बसविण्यात येत आहेत.
एकीकडे रुग्णालयात औषधीसाठी निधी नसताना दुसरीकडे विद्युतीकरणावर व्यर्थ खर्च होत आहे. रुग्णालयाच्या वतीने यासंदर्भात कोणतीही मागणी नसताना परभणी विभागाच्या वतीने ही कामे परस्पर केली जात आहेत. हा खर्च पाण्यात घालण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिकारी व कंत्राटदार यांच्यातील संबंधाने हा गैरव्यवहार होत असल्याची तक्रार नंदू पाटील यांनी केली आहे.