आमदारांनी शिवीगाळ केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:31 AM2021-05-20T04:31:44+5:302021-05-20T04:31:44+5:30

तलाठी संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त करून कळमनुरीचे तहसीलदार मयुर खेंगळे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाच्या मुलाचे ट्रॅक्टर पकडल्याने ही ...

Complaint to the District Collector for abusing MLAs | आमदारांनी शिवीगाळ केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

आमदारांनी शिवीगाळ केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

googlenewsNext

तलाठी संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त करून कळमनुरीचे तहसीलदार मयुर खेंगळे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाच्या मुलाचे ट्रॅक्टर पकडल्याने ही शिवीगाळ केल्याचा आरोप केला. रवी अप्पाराव शिंदे यांचे ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करीत असताना १८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता पकडले होते. ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच २७ एल ४४७० आहे. ते पकडून पोलीस ठाण्यात लावले होते. ते सोडण्यासाठी बांगर यांनी तहसीलदारांना भ्रमणध्वनीवरून हे ट्रॅक्टर सोडण्यास सांगितले. मात्र तहसीलदारांनी यात संबंधितांना उचित कारवाई करण्यास सांगितले. त्यामुळे १९ मो राेजी सकाळी पुन्हा बांगर यांनी तहसीलदारांना भ्रमणध्वनीवरून ट्रॅक्टर का सोडले नाही, याची विचारणा केली. तर मी या तालुक्याचा आमदार आहे. माझे ऐकत नाही का? मी काहीही करू शकतो. तुम्ही नवीन आहात एखाद्या प्रकरणात अडकवू शकतो. येथे काम करू देणार नाही. कार्यकर्ते तहसील कार्यालय फोडून टाकतील. आज तालुक्यातील रेती घाट बंद करून रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर बंद झाले पाहिजे. नाहीतर मी पाहून घेईन असे म्हणत अर्वाच्च शिवीगाळ केल्याचे म्हटले. याबबत माफी मागून अशी घटना पुन्हा घडणार नाही, याचे आश्वासन द्यावे अन्यथा २० मेपासून महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटनेने बेमुदत लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला. निवेदनावर विनोद ठाकरे, स.आयुब, विनायक किन्होळकर, गजानन रणखांब, प्रदीप इंगोले, शिवानंद झोळगे, ए.एम. सुळे, भास्कर पांडे आदींच्या सह्या आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना आ.संतोष बांगर म्हणाले, हे ट्रॅक्टर पकडल्यानंतर तहसीलदाराच्या माणसाने ५० हजारांत ते सोडून देऊ अन्यथा १.५० लाख भरावे लागतील व ट्रॅक्टर येथेच सडेल, असे सांगितले. मग याचा जाब मी विचारणार नाही, तर कोण विचारणार? ती क्लिप तपासून जिल्हाधिकाऱ्यांनीच तहसीलदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली.

Web Title: Complaint to the District Collector for abusing MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.