‘बांधकाम’ची ११२ कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:03 AM2018-03-09T00:03:13+5:302018-03-09T00:03:36+5:30
यंदा जीएसटीमुळे बांधकाम विभागाच्या विविध कामांना बे्रक लागला होता. त्यातच गेल्यावर्षीचीही काही कामे निविदांना झालेल्या विलंबामुळे प्रभावित झाली होती. आता जुनी व नवी अशी दोन्ही प्रकारची कामे करताना दमछाक होत असून तरीही १२ कोटींची कामे पूर्ण करण्यात यश आले आहे. ४.८५ कोटी शिल्लक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यंदा जीएसटीमुळे बांधकाम विभागाच्या विविध कामांना बे्रक लागला होता. त्यातच गेल्यावर्षीचीही काही कामे निविदांना झालेल्या विलंबामुळे प्रभावित झाली होती. आता जुनी व नवी अशी दोन्ही प्रकारची कामे करताना दमछाक होत असून तरीही १२ कोटींची कामे पूर्ण करण्यात यश आले आहे. ४.८५ कोटी शिल्लक आहेत.
हिंगोली जिल्हा परिषदच नव्हे, तर राज्यात सर्वत्रच बांधकामाच्या कामांना जीएसटीच्या निर्णयानंतर ब्रेक लागला होता. अनेक निविदांमध्ये साहित्याला लागणाºया जीएसटीमुळे मोठी वाढ झाली होती. त्यामुळे कंत्राटदार निविदाच भरायला तयार नव्हते. त्यामुळे यावर्षी निविदा प्रक्रिया करायलाही मोठा विलंब झाला होता. डिसेंबरअखेरपर्यंत यासाठी कोणतीच हालचाल होताना दिसत नव्हती. यात शासनाकडूनही ठोस निर्णय येत नसल्याने अधिकारी व पदाधिकारीही हतबल झाले होते. मात्र त्यानंतर शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना आल्या. त्यानुसार निविदांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया जि.प.त गतिमान पद्धतीने करण्यात आली. जिल्ह्यात विविध भागांचा समतोल राखताना अतिशय कमी किमतीची व मोठी कामेही घेतली जातात. त्याचबरोबर जि.प.सदस्य आपल्या भागात काम खेचून नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कामांची संख्याही मोठी असते. यात अंदाजपत्रके बनविताना दमछाक झाली. रस्ते मजबुतीची ६५ पैकी ४४ कामे पूर्ण तर २३ सुरू आहेत. यात गतवर्षीचे ८.५२ पैकी ७ कोटी खर्च झाले. तर यंदाचे २.६६ कोटी नियोजनातच आहेत. आदिवासी उपयोजनेत ७ पैकी ४ पूर्ण झाले आहेत. गतवर्षीचे ३७ लाख खर्च यंदाचे ८४ लाख प्राप्तच नाहीत. पर्यटन स्थळ विकासाची २ कामे अजून रखडलेलीच आहेत. एक पूर्ण झाले. ३५ पैकी ११ लाख शिल्लक आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राची २ कामेही अपूर्णच आहेत. यात गतवर्षीचे ४३.९१ शिल्लक व यंदाचे ५0 लाख मंजूर आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यांची १४ पैकी ६ कामे पूर्ण तर ८ कामे अपूर्ण आहेत. यात १९ लाख खर्च व १८ लाख शिल्लक आहेत.
यात्रास्थळ विकासाच्या ५0 कामांपैकी केवळ ३0 कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. तर २0 कामे शिल्लक आहेत. यात १.७१ कोटीपैकी ७१ लाख शिल्लक तर यंदाची तरतूद २.६३ कोटी आहे. आमदार स्थानिक विकास निधीतील ३७ कामे जुनी व नवीन ७ आहेत.
यातील २२ कामे पूर्ण झाली. तर २२ अपूर्ण आहेत. यात १.१0 कोटी खर्च झाला. खासदार निधीत ५ पैकी ४ कामे पूर्ण झाली. १७.३२ लाखांचा खर्च झाला. माध्यमिक शाळांची तीन कामे सुरू आहेत. १.५८ कोटी खर्च झाला. यंदा १.४0 कोटी मंजूर आहेत.
बांधकाम विभागाचे विविध योजनांमध्ये २0१६-१७ या आर्थिक वर्षात १६.३६ कोटी अखर्चित होते. तर २0१७-१८ मध्ये ९.५९ कोटींची मंजुरी मिळाली. १२.0६ कोटीच खर्ची पडले. उर्वरित शिल्लक आहे.