महामार्गासाठी १९ गावांची मोजणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:01 AM2018-01-06T00:01:08+5:302018-01-06T00:01:11+5:30
तालुक्यातून जाणाºया हिंगोली- नांदेड या १६१ राष्टÑीय महामार्गाचे रुंदीकरण व कळमनुरी, आखाडा बाळापूर या दोन गावच्या बायपाससाठी १९ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातून जाणाºया हिंगोली- नांदेड या १६१ राष्टÑीय महामार्गाचे रुंदीकरण व कळमनुरी, आखाडा बाळापूर या दोन गावच्या बायपाससाठी १९ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे.
कळमनुरी व आखाडा बाळापूरसाठी बायपास रस्ता होत आहे. राष्टÑीय महामार्गाच्या रुंदीकरणात तालुक्यातील २१ गावांच्या जमिनी जात आहेत. रस्ता रुंदीकरणात १५४ हेक्टर जमीन जाणार आहे. भूमी अभिलेखमार्फत मोजणी सुरू असून वसपांगरा, उमरा, घोळवा या तीन गावांच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवालही येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्राप्त झाला आहे. माळेगाव, पाळोदी, आराटी, साळवा, जरोडा, कामठा, येलकी, डोंगरगाव (पुल), शेवाळा, दाती, पिंपरी बु., कुंभारवाडी, कुर्तडी या गावांच्या जमिनीचे मोजमाप पूर्ण झाले असून अहवाल येणे बाकी आहे. येत्या दोन दिवसांत आखाडा बाळापूर येथील जमिनीच्या मोजणीला सुरूवात होणार आहे. कळमनुरी, शिवणी खुर्द, वारंगा फाटा, नरवाडी या चार गावांच्या जमिनीची मोजणी झाली नाही. कळमनुरी येथे सर्वे क्रमांक व गट क्रमांकामध्ये तफावत असल्याने येथील जमीन मोजणीचे काम थांबले होते.
१५ जानेवारीपर्यंत सर्व २१ गावांची मोजणी पूर्ण होणार आहे. निवाड्यानंतर मार्च महिन्यापासून रस्ता रुंदीकरण व बायपासच्या कामाला सुरूवात होणार आहे. रस्ता झाल्यानंतर या रस्त्यावरुन होणाºया वाहतुकीला उपयोग होऊन वेळेचीही बचत होणार आहे.