पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू हिंगोली जिल्ह्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:00 AM2017-12-21T00:00:19+5:302017-12-21T00:00:27+5:30

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

Complete the toilets, increase the Hingoli district's honor | पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू हिंगोली जिल्ह्याचा सन्मान

पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू हिंगोली जिल्ह्याचा सन्मान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा १00 टक्के हागणदारीमुक्त करायचा आहे. त्यामुळे मिशन म्हणून हे काम करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी केले आहे. जिल्ह्याला ८५ हजार ३१८ एवढे शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्याने १२ हजार ७३३ पैकी १0 हजार १११, वसमतने १८ हजार ६६८ पैकी १२ हजार ४0६, हिंगोलीने १३ हजार ३८६ पैकी १0 हजार ५९0, कळमनुरीत २0 हजार १0 पैकी ९८९0, सेनगावात २0 हजार ५२२ पैकी १0 हजार ४७४ एवढ्या शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.
यात औंढ्या तालुक्याला शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी अवघे २६२२, वसमतला ६२६२ तर हिंगोलीला २७९६ शौचालयांचे बांधकाम करावे लागणार आहे. कळमनुरीला १0 हजार १२0 तर सेनगावला १0 हजार ४७४ असे मोठे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे. जे आवाक्याबाहेर दिसून येत आहे. या दोन्ही तालुक्यांत सुरुवातीपासूनच ही कामे संथगतीने होत होती. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीत कामे रखडलेली आहेत, अशा ठिकाणच्या सरपंचांना या कार्यशाळेद्वारे प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
यात ग्रामसेवक व सरपंचांनी काय करायचे याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यांनी अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाºयांची पूर्वतयारी बैठक घ्यावी, यातून निवडलेल्यांना लाभार्थी दत्तक द्यावे, जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिलेल्या सूचना ग्रा.पं.स्तरावरील पदाधिकारी व कर्मचाºयांना द्याव्यात, लाभार्थी दत्तक देताना कर्मचारी व पदाधिकाºयांना सुलभपणे काम करता येईल, असाच लाभार्थी दत्तक द्यावा असे सुचित केले आहे. या पदाधिकारी, कर्मचारी मंडळीने लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेवून शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून द्यावे, तर ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्वीकारावी, तांत्रिक अडचण असल्यास संबंधित कक्षाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले.

Web Title: Complete the toilets, increase the Hingoli district's honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.