रखडलेल्या ७१४ घरकुलांची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:20 AM2018-12-23T01:20:24+5:302018-12-23T01:20:58+5:30

येथील पंचायत समिती कार्यालयाने दोन वषार्पासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील ७१४ घरकुलाची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पुर्ण केले असुन मराठवाड्यातील इतर पंचायत समितीच्या तुलनेत समाधानकारक काम केले आहे.

 Completed the works of 714 houses | रखडलेल्या ७१४ घरकुलांची कामे पूर्ण

रखडलेल्या ७१४ घरकुलांची कामे पूर्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाने दोन वषार्पासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील ७१४ घरकुलाची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पुर्ण केले असुन मराठवाड्यातील इतर पंचायत समितीच्या तुलनेत समाधानकारक काम केले आहे.
सेनगाव तालुक्यात घरकुल योजनेच्या कामाने गती पकडली आहे. तालुक्यात मागील दोन आर्थिक वर्षात रखडलेल्या घरकुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. लाभार्थ्यांना घरकुल अनुदान वेळेत न मिळणे, झालेल्या कामाचा पाठपुरावा करुनही मूल्यांकन न होणे यासह विविध कारणांमुळे सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या ७५३ पैकी ६६३ कामे रखडली होती. तर चालू आर्थिक वर्षात पुन्हा नवीन २६० घरकुल मंजूर झाले होते. पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता. तर रमाई आवास योजनेत२०१६-१७ मध्ये२५४ घरकुल मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ बारा पूर्ण झाले होते. तर २४२ कामे रखडली होती. त्यात पुन्हा नवीन २१८ घरकुल मंजूर झाले आहेत. त्यामुळे एकूण घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे मोठे आवाहन पंचायत समिती कार्यालयासमोर होते. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.व्ही.काळे यांनी या संबंधी मागील आठ महिन्यांपासून गावनिहाय भेटी देवून बांधकामे करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तांत्रिक अडचणी प्राधान्य देवून सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याने गेल्या आर्थिक वर्षातील ५८८ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. ७५ घरकुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. तर रमाई आवासची २१६ कामे पूर्ण केली आहेत. तसेच दोन्ही योजनेतील १७५ अशी एकूण ७१४ कामे आजपर्यंत पूर्ण झाली आहेत. औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सेनगाव पंचायत समितीच्या कामाचे कौतुक केले आहे.
घरकुलाच्या कामांचे मूल्यांकन करण्यासाठी पुरेसे अभियंते नसतानाही कामे पूर्ण झाली. दोन वर्षांपासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील घरकुलांची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पूर्ण केल्याने मराठवाड्यातील इतर पंचायत समित्यांच्या तुलनेत सेनगावचे काम समाधानकारक आहे.

Web Title:  Completed the works of 714 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.