संगणकीय ‘अग्निशामक’ यंत्रणा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:01 AM2018-06-11T00:01:02+5:302018-06-11T00:01:02+5:30
अचानक आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न केले जातात. हिंगोली नगरपालिकेचा कारभार मागील अनेक महिन्यांपासून एकाच अग्निशामकवर होता. मात्र आता त्यात भर पडली आहे. विभागाकडे नवीन अत्याधुनिक संगणकीय अग्निशामक वाहन उपलब्ध झाले. त्यामुळे आता अग्निशामक विभागाचे बळ वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अचानक आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न केले जातात. हिंगोली नगरपालिकेचा कारभार मागील अनेक महिन्यांपासून एकाच अग्निशामकवर होता. मात्र आता त्यात भर पडली आहे. विभागाकडे नवीन अत्याधुनिक संगणकीय अग्निशामक वाहन उपलब्ध झाले. त्यामुळे आता अग्निशामक विभागाचे बळ वाढले आहे.
हिंगोली नगर पालिकेकडे मागील सहा ते सात महिन्यांपासून केवळ एकच अग्शिामक वाहन उपलब्ध होते. पूर्वी दोन अग्निशामक होते. परंतु त्यातील एका वाहनात बिघाड झाला अन् ते वाहन भंगारात जमा झाले. त्यामुळे पालिकेचा कारभार एकाच वाहनांवर सुरू होता. नवीन अग्निशामकची मागणी करण्यात आली होती. आता या नवीन अग्निशामकची प्रतीक्षा संपली असून वाहन उपलब्ध झाले आहे. शिवाय नवीन वाहन कसे हाताळावे, कोणती खबरदारी घ्यावी, संगणक कसे चालवावे याबाबत चालक, व कर्मचाऱ्यांना दोनदिवसीय प्रशिक्षण दिले. अग्निशामक विभागातील चालक शाहीदखॉ पठाण, संदीप कांबळे, रघुनाथ बांगर, आकाश साबळे यांच्यासह इतर कर्मचाºयांनाही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अग्निशामक बाईकही विभागाकडे लवकरच उपलब्ध होणार आहेत.
अग्निशामक वाहनात पाणबुडी, जनरेटरची सुविधा
४आगीच्या घटना कधी कोठे घडतील याचा नेम नाही. जुन्या वस्तीमध्ये आग लागल्यास त्या ठिकाणी मोठे वाहन पोहोचू शकत नाही. त्यामुळे आता उपलब्ध झालेल्या अग्निशामकचा आकार लहान आहे. त्यामुळे मोठे अग्निशामक ज्या ठिकाणी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी हे वाहन गल्लीबोळीत सहज पोहोचू शकते. या अग्निशामकची ४०० लिटर वॉटरटँकची क्षमता असून ५० लिटर फोमची सुविधा वाहनांत उपलब्ध आहे. इतर अग्निशामकच्या तुलनेत हे वाहन दुप्पटीने काम करेल, असे कर्मचाºयांनी सांगितले. या वाहनांचे संपूर्ण काम संगणकावर आहे. तसेच वाहनात लाईट गेल्यास जरनेटरची सुविधा असून टँकमधील पाणी संपल्यास कुठल्याही ठिकाणी तलाव किंवा विहिरीतील पाण्याचा उपसा करता यावा. हे पाणी थेट टँकमध्ये भरल्या जावे यासाठी पाणबुडीची सुविधा आहे. तसेच आॅक्सिजन किट, एलईडी फोकस, अनाऊंसमेंटची सुविधा आहे.