अनेक ठिकाणांवरून गुरे चोरल्याची दिली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:23 PM2018-07-08T23:23:57+5:302018-07-08T23:24:18+5:30

येथील पोलीस ठाण्याचे सपोनि कोरंटलू यांनी ८ जून रोजी पहाटे ३.३० वा. पळशी टी पाईंटवर नाकाबंदी दरम्यान एम.एच ३० एबी ४५९८ या क्रमाकांच्या बोलेरो पिकअप मध्ये १ लाख रूपये किमतीची एक बैल जोडी घेऊन जाताना पकडली.

 Confessions of stolen cattle from many places | अनेक ठिकाणांवरून गुरे चोरल्याची दिली कबुली

अनेक ठिकाणांवरून गुरे चोरल्याची दिली कबुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरगाव : येथील पोलीस ठाण्याचे सपोनि कोरंटलू यांनी ८ जून रोजी पहाटे ३.३० वा. पळशी टी पाईंटवर नाकाबंदी दरम्यान एम.एच ३० एबी ४५९८ या क्रमाकांच्या बोलेरो पिकअप मध्ये १ लाख रूपये किमतीची एक बैल जोडी घेऊन जाताना पकडली.
फेरोज खा रशिद खा रा. सेलु बाजार असे आरोपीचे नाव असून, तो ही बैल जोडी घेऊन जात असताना आढळला. सुरुवातीला आरोपीने उडवा - उडविची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्या हालचालीवर शंका आल्याने कसुन चौकशी केली असता बैल चोरीचे असल्याचे त्यानी मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला ताब्यात घेऊन अजून सखोल चौकशी केली असता, त्यानी अशाच इतर १० गुन्ह्याची कबूली दिली. हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सदरील आरोपीकडून अजूनही चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे.
कारवाई सपोउपनि कुमरेकर, पोकॉ. इंगोले, चालक पाटील यांनी केली. गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हदीतही गुरे चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनेशी या आरोपीचा काही संबंध आहे का ? तसा पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे सवना, गोरगाव या ठिकाणीही गुरांची झालेली चोरी उघड होण्याची शक्यात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष याकडे लागले आहे. तसेच नाका बंदी कडक करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title:  Confessions of stolen cattle from many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.