हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान
By रमेश वाबळे | Published: April 26, 2024 12:01 PM2024-04-26T12:01:00+5:302024-04-26T12:02:49+5:30
वसमत शहरातील मतदान केंद्र २३८ वर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे जवळपास अर्धातास मतदान प्रक्रिया थांबली होती.
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी आज, २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून सुरु झाले असून, सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२३ टक्के तर ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली, वसमत, कळमनुरी, उमरखेड, किनवट, हदगाव असे ६ विधानसभा मतदारसंघ असून आज सकाळपासून २ हजार ८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. या निवडणुकीत एकूण १८ लाख १७ हजार मतदार आपला हक्क बजावणार असून, ३३ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत लोकसभा मतदार संघात ७.२३ टक्के मतदान झाले होते. तर ११ वाजेपर्यंत हिंगोली विधानसभा मतदार संघ २१.७३ टक्के, वसमत २०.९२ टक्के, कळमनुरी १५.०१ टक्के, उमरखेड १३.८५ टक्के, किनवट १९.२१ टक्के आणि हदगाव विधानसभा मतदारसंघात १८.३२ टक्के असे एकूण लोकसभा मतदार संघात १८.१९ टक्के मतदान झाले.
हिंगोलीत सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रावर गर्दी; सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान #LokSabhaElections2024#HingoliLoksabhapic.twitter.com/A5qLK7NmXD
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 26, 2024
दरम्यान, सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर वसमत शहरातील मतदान केंद्र २३८ वर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे जवळपास अर्धातास मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत झाली.