आंदोलनाच्या नियोजनार्थ काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:08 AM2018-01-16T00:08:34+5:302018-01-16T00:08:50+5:30

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने खा.राजीव सातव यांच्या नेतृत्वात फेब्रुवारीमध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनार्थ आज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.

 Congress meeting to organize the agitation | आंदोलनाच्या नियोजनार्थ काँग्रेसची बैठक

आंदोलनाच्या नियोजनार्थ काँग्रेसची बैठक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने खा.राजीव सातव यांच्या नेतृत्वात फेब्रुवारीमध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनार्थ आज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.
या बैठकीस आ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संतोष बोंढारे यांची उपस्थिती होती. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खा.सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगून त्याचे नियोजन केले. तर यावेळी कार्यकर्त्यांनीही आपापल्या भागातील प्रश्न मांडून त्यांचाही यात समावेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीस जिमस बँकेचे संचालक बाबा नाईक, जि.प.सदस्य दिलीपराव देसाई, डॉ.सतीश पाचपुते, भगवान खंदारे, नगरसेवक शेख निहाल, माबूद बागवान, अनिल नेनवाणी, बापूराव बांगर, नंदकिशोर तोष्णीवाल, रवी पाटील गोरेगावकर, माणिकराव पाटील, प्रशांत गायकवाड, श्यामराव जगताप, सुमेध मुळे, शंकरराव कºहाळे, जनार्दन पतंगे, विशाल घुगे, विश्वास बांगर, सलिमभाई पठाण, विलास गोरे, शे.अलिमोद्दिन, संजय राठोड, ज्ञानेश्वर जाधव, रविकिरण वाघमारे, धनंजय पाटील, शिवाजी मस्के, सुधीर राठोड, चांदू लांडगे, श्रीराम जाधव आदी उपस्थित होते.

Web Title:  Congress meeting to organize the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.