भविष्यात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने रोपटे लावून संगोपन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:31+5:302021-06-16T04:39:31+5:30
हिंगोली : भविष्यातील ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे प्रतिपादन अप्पर ...
हिंगोली : भविष्यातील ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी केले. समतादूत वृक्षारोपण पंधरवड्यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते १५ जूनरोजी बोलत होते.
यावेळी सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे, पोलीस निरीक्षक देविदास इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, कवायत निर्देशक निलेश मंगळूरकर, व्ही. एल. जायभाये आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्याहस्ते गुलमोहर, करंजी, चिंच, शिसव आदी रोपट्यांची लागवड करण्यात आली. यासाठी बार्टीचे समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, प्रफुल पटेबहादूर, सुनीता आवटे, संगीता खांदळे, बालाजी कटारे, पोलीस कर्मचारी ओंकार पवार, दत्ता आढाव, सविता कांबळे, विजया ठेंगडे, मयूर वायकुळे, आकाश बोथीकर, प्रशांत पंडित, गजानन कोठुळे आदींनी पुढाकार घेतला.
फोटो : ३७