जिल्हा कचेरीत अडगळीचे सामान करताहेत एकत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:16 AM2018-07-12T00:16:19+5:302018-07-12T00:16:48+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी अडगळीत पडलेले फर्निचर व इतर सामान दिसून येत आहे. ते एकत्रित करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्व कार्यालयातील सामानानेच एक खोली भरून गेली आहे. या सामानांचे वर्गीकरण करून वापरायोग्य नसलेले लिलावात काढले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी अडगळीत पडलेले फर्निचर व इतर सामान दिसून येत आहे. ते एकत्रित करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्व कार्यालयातील सामानानेच एक खोली भरून गेली आहे. या सामानांचे वर्गीकरण करून वापरायोग्य नसलेले लिलावात काढले जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांमध्ये तुटक्या, मोडक्या खुर्च्या, दरवाजे, टेबल आदी साहित्य अडगळीला पडलेले होते. तर नंतर बनविलेल्या फर्निचरचेही भाग निखळल्याने तेही काना-कोपºयात ठेवलेले होते. अनेक ठिकाणी जुन्या संचिकांचे गठ्ठेही पडून आहेत. त्यामुळे तेथील कर्मचाºयांना कार्यालयात फिरणेही अवघड झाले होते. काही ठिकाणी नूतनीकरण झाल्याने जुने सामान तसेच पडून होते. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, आरडीसी लतिफ पठाण, खुदाबक्ष तडवी, पांडुरंग बोरगावकर आदींसमवेत सर्व इमारतीची पाहणी केली. कुठे डागडुजीची गरज आहे आणि किती अनावश्यक सामान पडून आहे, याची चाचपणी केली. त्यातच जागा उपलब्धतेच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी चाचपणी केली. त्यात अनेक ठिकाणचे फर्निचर तळमजल्यावर आणून जमा केले आहे. त्यात वापरायोग्य, दुरुस्ती करून वापरायोग्य व लिलावात काढण्यालायक असे वर्गीकरण करण्यात येत आहे. वापरायोग्य सामान तहसीलला दिले जाईल. तर इतराचा लिलाव करण्यासाठी धोरण ठरविण्यात येणार आहे.