कंत्राटदार व पदाधिकाऱ्यांत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:28 AM2018-03-22T00:28:38+5:302018-03-22T00:28:38+5:30

जिल्हा परिषदेत विविध कामांच्या कंत्राटांवरून बुधवारी रात्री उशिरा पदाधिकारी व कंत्राटदारांतच जुंपली. जि.प.उपाध्यक्षांकडे मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मंडळींचा हा राडा पाहून इतरही आचंबित झाले.

 Contractors and officials are jumped | कंत्राटदार व पदाधिकाऱ्यांत जुंपली

कंत्राटदार व पदाधिकाऱ्यांत जुंपली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेत विविध कामांच्या कंत्राटांवरून बुधवारी रात्री उशिरा पदाधिकारी व कंत्राटदारांतच जुंपली. जि.प.उपाध्यक्षांकडे मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मंडळींचा हा राडा पाहून इतरही आचंबित झाले.
जिल्हा परिषदेत सध्या मार्च एण्ड असल्यामुळे विविध कामांच्या निविदा काढण्यात येत आहेत. या निविदा भरण्यावरून अनेक ठिकाणी जि.प. पदाधिकारी, सदस्य, कंत्राटदार यांच्यात वादाची ठिणगी पडत आहे. सदस्यांतही एकमेकांचे जमत नसल्याने एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी राजकारण खेळले जात आहे. दलित वस्तीच्या निधीवरून असेच राजकारण करण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. यातच काही जण एकमेकांचे जुने उट्टे काढत आहेत. शिवाय कंत्राटदारांतील वादही पदाधिकारी व सदस्यांना बेजार करीत आहेत.
बुधवारी अशाच काही प्रकरणांवरून एकमेकांच्या सर्कलमध्ये कामे टाकण्याच्या कारणावरून मध्यस्थीसाठी कंत्राटदार, पदाधिकारी एका दालनात एकत्र आले. मात्र जुने वाद पुढे आले आणि वादात भर पडली. परिणाम म्हणून आरे-तुरे झाली अन् एकमेकांवर खुर्च्या उचलण्यापर्यंत प्रकरण गेले. नंतर इतर सदस्य व पदाधिकाºयांना यात मध्यस्थी करताना नाकीनऊ आले. रात्री उशिरा घडलेल्या या प्रकाराबाबत दुजोरा मिळाला असला तरीही कुणी चकार शब्द बोलायला तयार नव्हते. पुढे हे प्रकरण काय वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title:  Contractors and officials are jumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.