कंत्राटदारांना आता ई-आरपी प्रणालीत देयके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:12 AM2018-10-02T01:12:36+5:302018-10-02T01:12:56+5:30
ग्राहकांना सुरळीत वीजसेवा मिळावी यासाठी महावितरणकडून नेहमीच नव-नवीन उपाययोजना करण्यात येतात. महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कायार्देश प्रक्रियेतही पारदर्शकता व गतिमानता यावी, यासाठी आता सदर प्रक्रिया ई-आरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्राहकांना सुरळीत वीजसेवा मिळावी यासाठी महावितरणकडून नेहमीच नव-नवीन उपाययोजना करण्यात येतात. महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कायार्देश प्रक्रियेतही पारदर्शकता व गतिमानता यावी, यासाठी आता सदर प्रक्रिया ई-आरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे.
या प्रणालीद्वारे प्रक्रिया पूर्ण न केल्यास कुठल्याही देयकाची अदायगी करु नये, असे स्पष्ट आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. महावितरणच्या वतीने दैनंदिन विविध आर्थिक व्यवहार ई-आरपी प्रणालीद्वारेच केले जातात. याबाबत महावितरणने ३१ मार्च २०१८ ला परिपत्रकही काढले होते. आता कंत्राटदारांनाही यातून सूट नाही. त्यामुळे आता कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश (वर्कआॅर्डर) ई-आरपी प्रणालीच्या माध्यमातूनच निर्मित करुन द्यायची आहे. या कार्यादेशात पीओ (पर्चेस आॅर्डर) क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आलेला आहे. या क्रमांकाचा उल्लेख नसल्यास देयकाला मंजुरी मिळणार नाही. तसेच संबंधित कंत्राटदाराला कामाच्या देयकाची अदायगीही मिळणार नाही. या प्रणालीमुळे महावितरणच्या कामकाजात गती आणि पारदर्शकता आली आहे. शिवाय कंत्राटदारांना त्यांची देयके निश्चित कालावधीत मिळत असल्याने विविध विकास कामांना अधिक गती मिळण्यास मदत होत आहे.