कोरोनामध्ये व्हेंटिलेटरवरील दीड हजारपैकी २८० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:22 AM2021-05-31T04:22:04+5:302021-05-31T04:22:04+5:30

हिंगोली : कोरोनाकाळात आतापर्यंत जवळपास दीड हजार रुग्णांची प्रकृती अतिगंभीर झाल्याने बायपॅप अथवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. यापैकी ...

In Corona, 280 out of 1,500 people on ventilators died | कोरोनामध्ये व्हेंटिलेटरवरील दीड हजारपैकी २८० जणांचा मृत्यू

कोरोनामध्ये व्हेंटिलेटरवरील दीड हजारपैकी २८० जणांचा मृत्यू

Next

हिंगोली : कोरोनाकाळात आतापर्यंत जवळपास दीड हजार रुग्णांची प्रकृती अतिगंभीर झाल्याने बायपॅप अथवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. यापैकी २८० जणांचा मृत्यू झाला आहे. व्हेंटिलेटरच्या ईटी ट्यूब व ड्युमिडिफायरच्या स्वच्छतेबाबत तक्रारी वाढल्यानंतर सहा दिवस स्वच्छ न करता वापरण्याची ही यंत्रणा आणली आहे.

हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत रुग्णसंख्या कमी होती. तर रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही कमी होते. मात्र दुसऱ्या लाटेत रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आणि अनेकांना बायपॅप व व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येत असल्याचे दिसून येत होते. आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त रुग्णांना व्हेंटिलेटवर व बायपॅप प्रणालीचा वापर करून उपचार देण्यात आले. यापैकी जवळपास २५० रुग्णांनी उपचाराला अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने त्यांचा अंत झाला. मात्र उर्वरित रुग्ण व्हेंटिलेटरवरून पुन्हा सामान्य जीवनात परतण्यात यशस्वी झाले आहेत. अतिगंभीर रुग्णांनाच आरोग्य विभागाकडून आधी बायपॅप व नंतर व्हेंटिलेटर लावण्यात येते. त्यातच आता जवळपास सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये वीस ते दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील ईटी ट्यूब व ड्युमिडिफायरच्या स्वच्छतेबाबत मध्यंतरी ओरड होती. जिल्हा रुग्णालयात या दोन्हींचीही सहा दिवसांनी बदलाची व्यवस्था केली, तर तत्पूर्वी नव्या रुग्णाला मशीन लावली तर बदलले जाते. इतरत्र मात्र रोज तीनवेळा स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. मात्र काहीही सांगितले जात असले तरीही अशी स्वच्छता होत नाही, हे वास्तव आहे. दिवसातून एखादेवेळी स्वच्छता केली जात असेल तर ते रुग्णांनाही कधी झाले हे कळत नाही.

सहा-सहा तासांनी ही स्वच्छता

व्हेंटिलेटर्सच्या ईटी ट्यूब व ड्युमिडिफायरची स्वच्छता दर सहा तासांनी होणे गरजेचे आहे. यासाठी स्टराइल वाॅटरचा वापर करावा लागतो.

जर अशा पद्धतीने स्टराइल वाॅटर वापरून स्वच्छता झाली नाही तर इन्फेक्शन वाढण्याचा अथवा भविष्यात म्युकरमायकोसिससारख्या आजाराचा धोका संभवतो.

हिंगोली

सुरुवातीला व्हेंटिलेटर लावायलाच डॉक्टर येत नव्हते, तर ईटी ट्यूब व ड्युमिडिफायरच्या स्वच्छतेचा प्रश्न आणखीच गंभीर होता. कधीतरी कुणी त्याकडे लक्ष द्यायचे.

वसमत

मी व्हेंटिलेटरवर होताे. डॉक्टरांनी तळमळीने उपचार केले. त्यात स्वच्छता किंवा इतर बाबीचे काही ज्ञान नव्हते. मात्र मी त्यांच्यामुळे बरा झालो, हे सांगू शकतो.

कळमनुरी

डॉक्टर कधी येतात, यातच आम्ही हैराण असतो. त्यांनाच व्हेंटिलेटरचे काही कळत नाही. आम्हाला त्याचे पाणी बदलले, स्वच्छता केली की नाही, हे काय कळणार?

डॉक्टर्स काय म्हणतात...

कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवरील ४९ पैकी ३ जणांचा मृत्यू झाला. व्हेंटिलेटरच्या ईटी ट्यूब व ड्युमिडिफायरची दिवसातून दोनदा १२ वाॅर्डबॉयमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली स्वच्छता केली जाते, असे डॉ. आनंद मेने म्हणाले.

व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांकडे विशेष लक्ष असते. त्यामुळे व्हेंटिलेटरच्या ईटी ट्यूब व ड्युमिडिफायरची वेळोवेळी स्वच्छता करून इन्फेक्शन होणार नाही याची दक्षता घेतली जाते, अशी माहिती वसमत उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सनाऊल्लाखान यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे ईटी ट्यूब व ड्युमिडिफायर एकदा लावले की, सहा दिवसांनी बदण्याच्या नव्या तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यातच स्टरीलाइझेशनची सुविधा आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले.

एकूण रुग्ण १५,५९८

उपचारानंतर बरे १४,८४२

व्हेंटिलेटर/बायपॅप लागलेले रुग्ण १५००

व्हेटिंलेटर लावूनही झालेले मृत्यू २८०

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.२०

Web Title: In Corona, 280 out of 1,500 people on ventilators died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.