कोरोनाचे नवे ६१ रुग्ण, ८४ जण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:29 AM2021-05-23T04:29:06+5:302021-05-23T04:29:06+5:30
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात २२ मे रोजी कोरोनाचे नवे ६१ रुग्ण आढळून आले असून ८४ जण बरे झाले आहेत. ...
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात २२ मे रोजी कोरोनाचे नवे ६१ रुग्ण आढळून आले असून ८४ जण बरे झाले आहेत. आता रुग्णवाढीचा आलेख खाली उतरला असला तरीही मृत्यूची संख्या मात्र घटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आज चौघांचा मृत्यू झाला.
अँटिजन चाचणीत ४५८ पैकी १७ बाधित आढळून आले. यात हिंगोली परिसरात १०० पैकी दाटेगाव १, भांडेगाव १ व खांबळा १ असे तीन बाधित आढळले. वसमत परिसरात ६५ पैकी व औंढा परिसरात ४ पैकी एकही बाधित नाही. सेनगावात ३४ पैकी शिवणी २, दाताडा १, लिंबाळा १, बोरखेडी १, मकोडी १, सुलदली १ असे ७ बाधित आढळले. कळमनुरी परिसरात २५५ पैकी सुकळी वळण १, मसोड १, लासिना २, पिंपरी बु. २, दांडेगाव १ असे ७ बाधित आढळले.
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात पांगरी १, पिंपळखुंटा १, आंबिका टॉकीज १, खानापूर १, ब्रह्मपुरी १, माळहिवरा १, आनंदनगर १, मंगळवारा १, पोलीस क्वार्टर १, नाईकनगर १, रामाकृष्णानगर १, नागझरी १, गांधी चौक १, डिग्रस कऱ्हाळे १, भटसावंगी तांडा १, नांदुरा १, ग्रामीण पोलीस ठाणेजवळ १, पातोंडा १ असे १८ रुग्ण आढळले. औंढा परिसरात जवळा बाजार १ व औंढा १ असे २ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात सेलसुरा ५, माळधामणी १, भाटेगाव १, कळमनुरी ३, डिग्रस १ असे ११ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात धानोरा ४, कौठा १, जयपूर १, कापडिसिंगी १, पळशी १ असे ८ रुग्ण आढळले. वसमत परिसरात सिनगी २, वसमत १, रोडगा १, वसमत १ असे ५ रुग्ण आढळले.
बरे झाल्याने आज ८४ जणांना घरी सोडले. यात सामान्य रुग्णालयातून ४२, कळमनुरीतून २०, औंढा ४, सेनगाव १३, वसमत ४, लिंबाळा १ असे रुग्ण बरे झाले. आजपर्यंत जिल्ह्यात १५,२८३ रुग्ण आढळले. यापैकी १४,४३० बरे झाले. तर सध्या ५२१ जणांवर उपचार सुरू आहेत. विविध कोविड सेंटरमध्ये दाखल २२७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यातील २०० ऑक्सिजनवर तर २७ बायपॅपवर आहेत.
चार जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आज कोरोनाने चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा रुग्णालयात कारेगाव ता. सेनगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ७५ वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे पाटीलनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, तेलगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ३३२ मृत्यू झाले आहेत.