कोरोनाचे नवे ८१ रुग्ण, ८४ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:28 AM2021-05-24T04:28:36+5:302021-05-24T04:28:36+5:30

हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत ९८ पैकी ३ बाधित आढळले. सेनगाव तालुक्यातीलच हे रुग्ण असून, खुडज १, कोळसा १, सेनगाव ...

Corona 81 new patients, 84 cured | कोरोनाचे नवे ८१ रुग्ण, ८४ बरे

कोरोनाचे नवे ८१ रुग्ण, ८४ बरे

Next

हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत ९८ पैकी ३ बाधित आढळले. सेनगाव तालुक्यातीलच हे रुग्ण असून, खुडज १, कोळसा १, सेनगाव १, अशी रुग्णसंख्या आहे. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात सावरखेडा १, आमला १, रेल्वेस्थानक परिसर १, जिजामातानगर ३, सिद्धार्थनगर १, शिवाजीनगर १, जांभरुण रोडगे १, सुलदली ३, सावरखेडा १, पोलीस क्वार्टर २, इसापूर १, सेनगाव १, खिल्लार १, दांडेगाव १, जामदया १, आर.के.नगर १, रुदनी १, गंगानगर १, अंतुलेनगर १, सुकापूर १, जवळाबाजार २, तपोवन १, असे २८ रुग्ण आढळून आले. औंढा परिसरात औंढा २, सिद्धेश्वर २, दरेगाव १, असे ५ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात सेलसुरा येथे एक रुग्ण आढळला. सेनगाव परिसरात सेनगाव ४, पातोंडा १, रिधोरा २, पळशी २, तांदूळवाडी १, दाताडा १, केलसुला १, मानसपूर १, गोरेगाव १, सुलदली १, साखरा १, खुडज २, असे १८ रुग्ण आढळले. वसमत परिसरात कुरुंदा ५, डोणवाडा १, अकोली १, बोथी १, सोमठाणा १, लोण १, पळशी १, गणेशपूर २, शहर पेठ १, मुडी २, पाटीलनगर १, मुरुंबा १, वसमत ७, असे एकूण २६ रुग्ण आढळले.

बरे झाल्याने ८४ जणांना घरी सोडले. यात जिल्हा रुग्णालयातून ५३, कळमनुरीतून ५, औंढ्यातून १०, सेनगावातून ४, वसमतमधून ५, लिंबाळा येथून ७ जणांना घरी सोडले.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५३६४ रुग्ण आढळले. यापैकी १४५१४ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, तर ५१७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. यापैकी १८३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. ३० जण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे. एकूण २१३ जणांची प्रकृती गंभीर आहे.

रविवारी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे लिंगी येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ३३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona 81 new patients, 84 cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.