कोरोना कमी; परंतु इतर आजार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:25 AM2021-01-04T04:25:25+5:302021-01-04T04:25:25+5:30
मार्च महिन्यांपासून नोव्हेंबर महिन्यांपर्यंत कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत होते. आज कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. आपण ...
मार्च महिन्यांपासून नोव्हेंबर महिन्यांपर्यंत कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत होते. आज कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. आपण दवाखान्यात दाखल झालो तर कोरोनाचा आजार आपल्याला जडेल या भीतीपोटी रुग्ण दवाखान्यात येत नव्हते. आठ महिने केवळ कोरोनाचेच रुग्णच दवाखान्यात होते. मागील दोन-अडीच महिन्यांपासून कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे वीस-बावीस दिवसांपासून वातावरणात बदलही झाला आहे. थंडीसह गार वारे व ढगाळ वातावरणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये त्वचारोग, दमा, श्वसनाचे आजार, पोटदुखी, जुलाब, ॲलर्जी, ताप, सर्दी, खोकला आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे.
कोरोना आजार कमी झाला असून, रोज तीन-चार रुग्ण काळजी न घेतल्यामुळे वाढत आहेत. कोरोना आजार होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा अशा सूचनाही दिल्या जात आहेत. एकंदर इतर रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
२०१८-१९ या वर्षात साडेचार हजार रुग्णांनी बाह्यरुग्ण सेवा घेेतली. ६० हजार रुग्णांनी अंतररुग्ण म्हणून सेवा घेतली. २०१९-२० मध्ये ४ लाख ८२ हजार २७२ रुग्णांची बाह्यरुग्ण सेवा घेतली आणि ६५ हजार ७६१ रुग्णांनी अंतररुग्ण म्हणून सेवा घेतली. एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात १ लाख १३ हजार ४७८ रुग्णांनी ओपीडी सेवा घेतली. २६ हजार ८०७ अंतररुग्ण म्हणून दाखल झाले. कोरोना काळात बाह्यरुग्ण व अंतर रुग्णांचे प्रमाण कमी होते. डिसेंबर महिन्यात मात्र ही संख्या वाढलेली पहायला मिळत आहे.
तुलनात्मकदृष्ट्या कोरोना काळात इतर रुग्ण दवाखान्यात येण्यास तयार होत नव्हते. आता इतर आजाराचे प्रमाण वाढले आहेत. शस्त्रक्रियाही सुरू झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालय हिंगोली, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, ग्रामीण रुग्णालय सेनगाव, औंढा, बाळापूर आणि स्त्री रुग्णालय वसमत या पाच संस्थेतील रुग्णांनी अडीच वर्षात सेवा घेतल्या. कोणतीही भीती न बाळगता इतर आजाराच्या रुग्णांनी दवाखान्यात संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.