कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:31 AM2021-05-19T04:31:11+5:302021-05-19T04:31:11+5:30

हिंगोली : कोरोना संसर्ग लक्षात घेता यावर्षी अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत. तसेच मागील वर्षी लग्न झालेल्या जोडप्यांनीही ...

Corona epidemic prolongs cradle! | कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला !

कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला !

Next

हिंगोली : कोरोना संसर्ग लक्षात घेता यावर्षी अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत. तसेच मागील वर्षी लग्न झालेल्या जोडप्यांनीही पाळणा लांबविणेच पसंत केले आहे. र्त्यामुळे जन्मदरात घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. सध्या दुसरी लाट सुरू असून यामध्ये रूग्ण दगावत आहेत. कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने काही बाबीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे लग्न सोहळ्यावरही मर्यादा आल्या आहेत. गतवर्षी काही लग्न सोहळे छोटेखानी कार्यक्रमात आटोपण्यात आले. याही वर्षी मोजक्याच पाहुण्यांच्या साक्षीने लग्न साेहळे पार पडले. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असून आता लहान मुलांनाही कोरोना होत असल्याने समोर आले आहे. त्यामुळे पालक लहान बाळांची काळजी घेत असून कोणताही धोका पत्कारायला तयार नाहीत. कोरोनामुळे लहान बाळांनाही संसर्ग होण्याची भीती लक्षात घेता लग्न झालेल्या जोडप्यांनी पाळणा लांबविण्याला पसंती दिली आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी जन्मदरात घट झाल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी पेक्षा लग्नांची संख्या वाढली

दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर लग्न सोहळ्यांची धामधूम सुरू होती. गतवर्षी कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला अन् तारखा जाहीर केलेले लग्न सोहळे पुढे ढकलावे लागले. काही जणांनी मोजकेच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकले. याही वर्षी कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी सुरवातीला अनेक विवाह सोहळे पार पडले. त्यानंतरही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळे आयोजित करण्यात येत आहेत. मात्र कोरोनामुळे अनेकांनी शासन दरबारी लग्न झाल्याची नोंद केली नाही.

जन्म दरात झाली घसरण

कोरोनामुळे लग्न झालेल्या जोडप्यांनी पाळणा लांबविण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे जन्मदरात घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार २०१८-१९ मध्ये १६ हजार ८३२ बालके जन्माला आली. त्यानंतर २०१९-२० मध्ये १६ हजार ३१७ तर २०२०-२१ (मार्चअखेर)मध्ये १५ हजार ४९९ बालके जन्माला आल्याची नोंद आहे.

वर्षे जन्म मृत्यू (० ते ५ वर्षे वयोगट)

२०१८-१९ १६८३२ २३९

२०१९-२० १६३१७ २०८

२०२०-२१ (मार्चअखेर) १५४९९ १७९

Web Title: Corona epidemic prolongs cradle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.