कोरोनाचे नव्याने तीन रुग्ण आढळले : एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:28 AM2021-02-12T04:28:00+5:302021-02-12T04:28:00+5:30
जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी परिसरातील २७ जणांची रॅपीड ॲटीजेन टेस्ट घेण्यात आली. यावेळी वसमत परिसरात १ कोरोनाचा रुग्ण आढळून ...
जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी परिसरातील २७ जणांची रॅपीड ॲटीजेन टेस्ट घेण्यात आली. यावेळी वसमत परिसरात १ कोरोनाचा रुग्ण आढळून आला. तसेच काही जणांची आरटीपीसीआर टेस्ट घेतली असता हिंगोली परिसरात १, कळमनुरी परिसरात १ असे एकूण ३ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५ रुग्णांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७८८ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३ हजार ६९५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.