मनोरुग्णांना कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:51 AM2021-02-05T07:51:37+5:302021-02-05T07:51:37+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील मनोरुग्णालयातून बरे झालेल्या मात्र, उपचार सुरू असलेल्या रुग्णांना कोरोनाचा फटका बसला आहे. मार्च ते ऑक्टोबर या ...

Corona hits psychiatrists | मनोरुग्णांना कोरोनाचा फटका

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका

Next

हिंगोली : जिल्ह्यातील मनोरुग्णालयातून बरे झालेल्या मात्र, उपचार सुरू असलेल्या रुग्णांना कोरोनाचा फटका बसला आहे. मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांच्या काळात उपचारासाठी त्यांना रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागला, परंतु सद्य:स्थितीत कोरोना व्यवहार सुरळीत झाल्याने, दवाखान्यात उपचारासाठी जाण्यास मार्ग सुकर झाला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ महिन्यांतील ओपीडी १ हजार ८६६ आहे. सद्य:स्थितीत १२७ रुग्ण भरती असले, तरी उपचार घेऊन परत ते घरी जात आहेत, नंतर काही त्रास जाणवू लागल्यास परत उपचारासाठी येत आहेत. मार्च ते ऑक्टोबर, २०२० या काळात जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोरुग्णतज्ज्ञ डॉ.दीपक डोणेकर, डॉ.शाहू शिराढोणकर, डॉ.राहुल डोंगरे, समुपदेशक अब्दुल शेख, अशोक क्षीरसागर यांनी ७ हजार २४३ मनोरुग्णांना समुपदेशन केले. कोरोना काळात हिंगोली, सेनगाव, वसमत, कळमनुरी, औंढानागनाथ या पाच तालुक्यांत स्थलांतरित मजूर आपल्या गावापासून दूर होते. या दरम्यान, हे सर्व मजूर द्विधा मन:स्थितीत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत होती. यावेळी त्यांचे हावभाव ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन स्थलांतरितांचे समुपदेशन केले.

कोरोना काळात बाहेर पडणे मुश्कील होऊन बसले होते. या दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेद्वारे अनेक मनोरुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. यावेळी त्यांना औषधोपचार करून समुपदेशन केले.

मानसिक आजारातील लक्षणे

झोप न येणे, चिडचिडपणा वाजवीपेक्षा वाढणे, कामात मन न लागणे, सतत घबराहट होणे, आजारी पडतो की काय? याची भीती वाटणे, सतत डोके दुखणे, भविष्यातील काही गोष्टीची चिंता वाटणे, शरीरातील हालचालीची चिंता वाटणे आदी मानसिक आजारातील लक्षणे आहेत.

प्रतिक्रिया

आपल्या मनातील भावना आप्तेष्ट, मित्र परिवारांजवळ व्यक्त करावी. झोप पूर्ण करावी, रोज तीन लीटर तरी पाणी पिणे, पौष्टिक आहार रोजच्या रोज वेळेवर घेणे, व्यसनापासून दूर राहणे. या सर्व गोष्टीचे पालन केल्यास मानसिक आजारापासून दूर राहता येते. गरज पडल्यास १०४ या क्रमांकावर डायल केल्यास समुपदेशन केले जाते.

-डॉ.दीपक डोणेकर, मनोरुग्णतज्ज्ञ, हिंगोली

आठ महिन्यांची ओपीडी: १,८६६

सध्या भरती रुग्ण: १२७

समुपदेशन केलेले रुग्ण: ७ हजार २४३

Web Title: Corona hits psychiatrists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.