पहिली लाट रोखलेल्या ३४१ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:22 AM2021-04-29T04:22:20+5:302021-04-29T04:22:20+5:30
दुसऱ्या लाटेत अशी झाली गावांची वाढ पहिल्या लाटेत हिंगोली तालुक्यात १५३ पैकी ३१, कळमनुरीत १५१ पैकी २३, सेनगावात १३३ ...
दुसऱ्या लाटेत अशी झाली गावांची वाढ
पहिल्या लाटेत हिंगोली तालुक्यात १५३ पैकी ३१, कळमनुरीत १५१ पैकी २३, सेनगावात १३३ पैकी २३, औंढ्यात १२२पैकी ११ तर वसमतला १५२ पैकी २३ गावात कोरोनाचा शिरकाव झाला होता.
दुसऱ्या लाटेत मात्र गावांची संख्या तिपटीने वाढल्याचे चित्र आहे. यात हिंगोली तालुक्यात ९२, कळमनुरीत १०१, औंढ्यात ७१, सेनगावात ९४, वसमतला ९२ अशी गावांची एकूण संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण गावे
७११
सध्या कोरोनाचे रुग्ण असलेली गावे
१२३
कोरोनामुक्त गावे
५८८
आमचे काय चुकले?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रवेशबंदी, क्वारंटाईन, विलगीकरण कामी आले. नंतर वातावरण बदलले अन् यात शिथिलता आली. बाहेर उपचारास गेलेल्या रुग्णांमार्फत गावात कोरोना आला. आता मास्क, निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतराबाबत जागरुकता आणून नियंत्रण आणले आहे.
-रघुनाथ भाऊराव गुहाडे, सरपंच, पोत्रा
सवन्यासारखे मोठे व रस्त्यावरील गाव पहिल्या लाटेत अनेक प्रकारचे नियम पाळल्याने कोरोनापासून दूर राहिले. मात्र नंतर यात शिथिलता आली. रुग्णच नसल्याने लोक नियम विसरले. आता रुग्ण आढळले. मात्र त्यांचा संपर्क शोधून सर्वांना दाखल केले जात आहे. संसर्ग रोखण्याची काळजी घेत आहोत.
-शोभाबाई विलासराव नायक, सरपंच, सवना
पहिल्या लाटेत गावात सगळे नियम पाळले जात होते. मध्यंतरी कोरोना संपल्यासारखी स्थिती आली. त्यात ग्रामप्रशासन व नागरिकही गाफील झाले. त्यामुळे रुग्ण आढळले. मात्र आता संसर्ग वाढू नये, याची काळजी घेतली जात आहे. रुग्णांचा संपर्क शोधून उपचाराला पाठवत आहोत.
-डॉ. प्रल्हाद वाघमारे, सिद्धेश्वर नंदगाव