तिसऱ्या दिवशीही कोरोना रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:55+5:302021-07-11T04:20:55+5:30
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळत नसल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास दीड हजार चाचण्या केल्यानंतरही रुग्ण आढळला ...
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळत नसल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास दीड हजार चाचण्या केल्यानंतरही रुग्ण आढळला नसल्याने आता कोरोनाचा कहर कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, हे वातावरण जपणे तेवढेच महत्त्वाचे आहे. रॅपिड अँटिजनची आज हिंगोलीत २९, कळमनुरी ७२५, सेनगाव ७३, वसमत १५१, औंढा ११३ जणांची चाचणी करूनही कोणी बाधित आढळले नाही. आरटीपीसीआरच्या हिंगोली ९, औंढा ३७, कळमनुरी ४३७ अशा चाचण्या केल्यानंतरही कोणी बाधित आढळले नाही. आज जिल्हा रुग्णालयातून बरे झाल्याने संदर्भित असलेल्या रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ९५३ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ५५२ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले, तर १७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. यापैकी ९ जण ऑक्सिजनवर तर २ जण बायपॅपवर असल्याचे रुग्णालयाकडून कळविण्यात आले.