सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण नाही; दोन बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:35+5:302021-07-10T04:21:35+5:30
हिंगोली जिल्ह्यात ९ जुलै रोजी हिंगोली १८०, कळमनुरी १३६, सेनगाव ४५, वसमत १८६, औंढा १०३ अशी ६५० जणांची अँटिजन ...
हिंगोली जिल्ह्यात ९ जुलै रोजी हिंगोली १८०, कळमनुरी १३६, सेनगाव ४५, वसमत १८६, औंढा १०३ अशी ६५० जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात एकही बाधित आढळला नाही, तर आरटीपीसीआरची हिंगोली ११, वसमत ६८, औंढा ३३, कळमनुरी ४७८ अशा ५९० जणांची चाचणी केल्यानंतर एकही बाधित आढळला नाही. बरे झाल्याने आज नवीन कोविड हॉस्पिटलमधून एक तर लिंबाळा केअर सेंटरमधून एक रुग्ण घरी सोडला.
आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १५ हजार ९५३ रुग्ण आढळून आले. यापैकी १५ हजार ५५१ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, तर ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १८ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले असून २ जण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.