कोरोनामुळे घटला कुटुंब नियोजनाचा टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:31 AM2021-04-22T04:31:02+5:302021-04-22T04:31:02+5:30
सेनगावात चांगले काम, इतरांना खासगीचा आधार सेनगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कवठा वगळता सर्वत्र चांगले काम ...
सेनगावात चांगले काम, इतरांना खासगीचा आधार
सेनगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कवठा वगळता सर्वत्र चांगले काम झाले. हिंगोली असो वा वसमत या ठिकाणी खासगी डॉक्टरांनी केेलेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाच उद्दिष्टापैकी बहुतांश भाग पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरल्या आहेत. या ठिकाणी शासकीय यंत्रणांनी फारसे काम केले नाही. तालुक्याच्या ठिकाणी कोविडकडे यंत्रणा वळती झाल्याचे समजून घेता येईल. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रांनीही फारसे काम केले नसल्याचे दिसून येत आहे. वसमत व कळमनुरी तालुक्यात तरी एक-दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत हे काम झाले. त्यामुळे शहरी ६८ टक्के, तर ग्रामीणचे २० टक्केच काम दिसत आहे.
पाच वर्षांतील कामगिरी अशी
२०१५-१६ ६७८६ ८८ टक्के
२०१६-१७ ६७८१ ८० टक्के
२०१७-१८ ५८४५ ६९ टक्के
२०१८-१९ ५५८३ ६६ टक्के
२०१९-२० ५०७१ ६० टक्के