शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रोखला जातोय कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:30 AM2021-04-21T04:30:00+5:302021-04-21T04:30:00+5:30
जिल्हाभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. संचारबंदीतून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला ...
जिल्हाभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. संचारबंदीतून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सुरक्षित अंतर राखण्यासह, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, हात स्वच्छ धुण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनेही कोरोना तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. मात्र तरीही काही नागरिक कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात काम नसतानाही काही जण फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. वारंवार सांगूनही शासकीय कार्यालयात येणारे नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने आता शासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश देण्यापूर्वीच प्रवेशद्वारावर रोखले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेत पंधरा दिवसापूर्वी अभ्यागतांना येण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. आता इतर शासकीय कार्यालयात येणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. काही ठिकाणी तर तपासणी केल्यानंतरच अत्यावश्यक काम असणाऱ्यांना आतमध्ये सोडले जात आहे. येथील जिल्हा उपनिबंधक, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात दरवाजा जवळच टेबल, खुर्ची आडवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्यांना प्रतिबंध बसला आहे. दरवाजा जवळच कर्मचारी अभ्यागतांची चौकशी करीत आहेत. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दरवाजा जवळ सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. या उपक्रमामुळे कोरोना आजारास प्रतिबंध बसण्यास मदत होत आहे.
फोटो :