कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्चकपात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:16+5:302021-07-13T04:07:16+5:30
हिंगोली : कोरोना काळात ज्यांनी नोकऱ्या गमावल्या आणि ज्यांचे पगार कमी झाले अशांनी आता काटकसर सुरु केल्याचे पहायला मिळत ...
हिंगोली : कोरोना काळात ज्यांनी नोकऱ्या गमावल्या आणि ज्यांचे पगार कमी झाले अशांनी आता काटकसर सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. श्रीमंतापासून गरीबांपर्यत सर्वच जण काटकसर करण्याकडे वळले असल्याचे पहायला मिळत आहे. एकंदर कोरोनाने पहिला धडा दिला एवढे मात्र निश्चित.
कोरोनाआधी श्रीमंत मंडळी मोठ्या हाॅटेलातून पार्सल मागवायचे. तसेच चमचम पदार्थ खाण्याची सवय अनेकांना जडली होती. बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय कोरोनाने बंद केली आहे. त्याचबरोबर स्वच्छता कशी ठेवायची? कशी अंगी बाळगायची? याबाबतही कोरोनाने पहिला धडा देत एक प्रकारे प्रशिक्षण दिले आहे. किचनपासून कटींगपर्यत काॅस्टकटींग कशी करायची ? हेही कोरोनाने शिकविले आहे. कोरोनाआधी गंधपावडरवर व इतर वस्तूवर पैसा खर्च व्हायचा. कोरोना महामारीमुळे आता तो कमी झाला आहे. विशेष सांगायचे झाल्यास कोरोनाने बचत करायलाही शिकविले आहे.
कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग....
कोरोनाआधी गरीबांपासून श्रीमंत मंडळीपर्यत सर्वच जण बाहेरचे पदार्थ खाण्यावर भर द्यायचे. सायंकाळच्यावेळी तर पाणीपुरी व भेळच्या गाड्यावर गर्दी असलेली दिसायची. हे सर्व कोरोनाने बंद केले.
पिझा, बेकरीवरील पदार्थ,चमचम भाज्या, आलेल्या मंडळीचा पाहुणचार आदी सर्वकाही थाटामाटात केले जायचे. परंतु, कोरोनामुळे हे आपोआपच बंद झाले, एवढे मात्र नक्की.
कोरोनाआधी सहलीला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की, हौसेखातर काही मंडळी चारचाकी घेऊन निघायचे. पण आता घरी बसणे पसंत करीत आहेत.