कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:22+5:302021-06-23T04:20:22+5:30
लसीकरणासाठी मध्यंतरी रांगा लागत होत्या. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता अनेक केंद्रांवर असलेली बसण्यासाठीची केलेली व्यवस्था गायब झाली. ...
लसीकरणासाठी मध्यंतरी रांगा लागत होत्या. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता अनेक केंद्रांवर असलेली बसण्यासाठीची केलेली व्यवस्था गायब झाली. काही ठिकाणी ही व्यवस्था अजूनही असली तरीही वापर कोणी करीत नाही. लस घेतली की थेट केंद्राबाहेर पडणारेच जास्त झाले. काहीजण चार ते पाच मिनिटे परिसरात घुटमळल्यानंतर घराचा रस्ता धरताना दिसत आहेत. या केंद्रांवर बऱ्याचदा आता नेमलेले डॉक्टरही राहत नसल्याचे चित्र दिसून येत
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
लसीकरण केल्यानंतर त्या केंद्रावर असलेल्या आसनव्यवस्थेत किमान अर्धा तास थांबणे गरजेचे आहे. काही गंभीर दुष्परिणाम याच काळात समोर येतो. या ठिकाणी डॉक्टर, या दुष्परिणामावरील इंजेक्शन, ऑक्सिजन, रुग्ण्वाहिका अशी सर्व प्रकारची व्यवस्था असते. त्यामुळे थेट घरी न जाता थांबणे आवश्यक आहे.
लस हेच औषध
कोरोनावर अजूनही कोणतेच औषध सापडले नाही. सध्या तरी लस हाच पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. आता ३० वर्षांपुढील सर्वांनाच लस दिली जात असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे डॉ.प्रेमकुमार ठोंबरे यांनी सांगितले.
थेट घरी जाऊ नये
नागरिकांनी लस घेतल्यावर किमान अर्धा तास केंद्रावर थांबले पाहिजे. दुर्दैवाने काही दुष्परिणाम जाणवले तर लागलीच त्यावर उपाय करणे शक्य आहे. आजपर्यंत कोणाला दुष्परिणाम आढळले नाहीत.
डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्ह्यात आजपर्यंत झालेले लसीकरण
१५४४५६
पहिला डोस ११८२०६
दुसरा डोस
३६२५०
एकूण केंद्र
८८
३० ते ४० साठी केंद्र
१०