कोरोना लसीकरणांचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:47+5:302021-01-09T04:24:47+5:30

काेविड-१९ लसीकरणांतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ...

Corona vaccinations should be carefully and properly planned - Collector | कोरोना लसीकरणांचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे - जिल्हाधिकारी

कोरोना लसीकरणांचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे - जिल्हाधिकारी

Next

काेविड-१९ लसीकरणांतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गित्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, शासनाकडून कधीही कोरोनाची लस प्राप्त होऊ शकते. त्यानुसार आरोग्य यंत्रणेने लसीकरणाबाबतचे सूक्ष्म व योग्य नियोजन करावे. लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार प्राधान्याने आरोग्यसंबंधित कार्यरत कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत कोरोना लसीकरण महत्त्वाचा विषय असल्याने आरोग्य यंत्रणांनी याकडे काळजीपूर्वक, भान ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याची अंदाजे १४ लाख ५० हजार लसींची साठवणूक करण्याची क्षमता आरोग्य विभागाकडे आहे, तसेच कोरोना लस साठवणुकीबरोबरच लसीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन करून यंत्रणा सज्ज ठेवावी. लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे.

जिल्हास्तरावरून आरोग्य संस्थेचे आणि लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम वेळेत पूर्ण करावे. कोरोना लस घेणाऱ्यांची निवड करून त्यांचे ‘कोविन ॲप’मध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करण्याचे कामदेखील वेळेत पूर्ण करावे. लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींना मेसेजद्वारे वेळ कळविण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रात गर्दी होऊ नये, तसेच लसीकरण झालेली व्यक्ती दुसऱ्याच्या संपर्कात येऊ नये, यासाठी योग्य नियोजन करावे. लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी येण्या-जाण्याचा मार्ग वेगवेगळा करावा. लसीकरण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना निरीक्षण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी निरीक्षण कक्षात योग्य नियोजन करावे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने लसीकरणाचे सूक्ष्म व योग्य नियोजन करावे.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी २ लसीकरण केंद्रे अशी यामध्ये ४८ लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रत्येक सत्रात १०० जण असे एकूण ४ हजार ८०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे, तर शहरी भागात हिंगोली ४, वसमत ४, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव प्रत्येकी २, अशा एकूण १४ केंद्रांवर १ हजार ४०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने आज जिल्ह्यात ३ ठिकाणी कोरोना लसीकरणाबाबतची यशस्वी रंगीत तालीम घेण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी दिली. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात परदेशातून, तसेच बाहेरील शहरातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यावेळी दिले.

Web Title: Corona vaccinations should be carefully and properly planned - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.