४४९ जणांना दिली कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:30 AM2021-01-25T04:30:49+5:302021-01-25T04:30:49+5:30
१६ जानेवारीपासून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. पहिल्या सत्रात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिकांना, ...
१६ जानेवारीपासून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. पहिल्या सत्रात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिकांना, आशा वर्कर, समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, चालक, औषध निर्माण अधिकारी आदींना लस देण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राअंतर्गत काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्या सत्रात लस दिली जात आहे. २७ जानेवारी रोजी १११ जणांना लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात येणार आहे. लस दिलेले सर्व ४४९ जण ठणठणीत आहेत. लस दिलेल्यापैकी कोणत्याही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीचे विपरीत परिणाम दिसून आलेले नाहीत.
कळमनुरी तालुक्यात लसीकरण यशस्वी झाल्याची माहिती डॉ. शेख यांनी दिली. सध्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे काम सुरू असून यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोणतीही भीती न बाळगता सर्वांनी लस घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.