डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाणार कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:54+5:302021-01-08T05:36:54+5:30
सर्वच राज्यांतील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेवक तसेच कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाणार ...
सर्वच राज्यांतील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेवक तसेच कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य सेवकांनाही कोरोना लसीबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोना लसीच्या सुरक्षितेबाबत पसरविल्या जात असलेल्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. कोरोना लसीची सुरक्षितता व परिणामकारकतेबाबत लोकांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
लोकांनी कोरोना आजार वाढू नये यासाठी बाजारात जातेवेळेस मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. घरी आल्यानंतर मास्क बदलून घ्यावे अन्यथा धुवून ठेवावे. सॅनिटायझरचा पुरेपूर वापर केल्यास कोरोना आजाराला आळा बसू शकतो. सध्या हिंगोली जिल्ह्यात कोरोना आजाराचे प्रमाण कमी आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या कोरोनोचा कहर कमी झाला आहे. ४ जानेवारी रोजी एकही रुग्ण कोरोनाचा आढळून आला नाही. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण काहीच नाही. लोकांनी सामाजिक अंतर, जेवणाच्या अगोदर हात धुणे, सॅनिटायझरचा वापर वारंवार करणे या बाबींकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा लसीकरणासाठी तयार आहे. प्रथम टप्प्यात खाजगी आणि सरकारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. लस देण्याची नियोजन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वरिष्ठ कार्यालयासाठी नावनोंदणीही केली असून, सर्वजण लस घेण्यासाठी तयार आहेत.
डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली
शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत अभिनंदनीय असाच आहे. नागरिकांपेक्षा जास्त करून डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोना संकटात सामोरे जावे लागत आहे. शासनाने सर्व बाबींचा सखोल असा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊन डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना आधी लस देण्याचे प्रयोजन केले आहे. त्यामुळे आनंद होत आहे.
सचिन बगडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष
हिंगोलीतील डाॅक्टर लस घेण्यासाठी झाले तयार
कोरोनाची लस सर्वात आधी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना दिली जाणार या शासनाच्या निर्णयाचे हिंगोलीतील डाॅक्टरांनी स्वागत केले आहे. जनतेच्या आधी आम्हाला लस मिळत आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्ही द्विधा मनस्थितीत नाहीत. लस घेण्यासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी नोंदणीही केली आहे.