जिल्हाकचेरीत कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:48+5:302021-01-03T04:29:48+5:30
यावेळी मंत्री टोपे म्हणाले, हिंगाेली जिल्ह्यात प्रशासनाने चांगले काम केले आहे. अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचविल्या आहेत तसेच अनेक ...
यावेळी मंत्री टोपे म्हणाले, हिंगाेली जिल्ह्यात प्रशासनाने चांगले काम केले आहे. अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचविल्या आहेत तसेच अनेक ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा निर्माण केली. अशा ४०० बेडस् झाल्या. आरोग्यसंस्थांची दुरुस्ती करून उणिवा दूर केल्या. येथील सर्व रिक्त जागा भरण्यात येतील तसेच एमआरआय मशीन देण्यात येईल. तर तालुका रुग्णालयात डीपीसीतून धर्मशाळा उभारण्याची सूचनाही त्यांनी केली. नर्सिंग कॉलेजही उभारण्यात येईल, असे सांगितले. यावेळी कोरोनायोद्धा डॉ. शिवाजी पवार, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. नामदेव कोरडे, डॉ. सुनील देशमुख, शेख रौफ अ.रहेमान, डॉ.अविनाश गायकवाड, डॉ. अलोक गट्टू, डॉ. गिरीश बल्फेवाड, डॉ. अमोल दिपके, डॉ. महादेव वानखेडे, डॉ. नरेंद्र थोरात, डॉ. राजकुमार बोथीकर, डॉ. मदन गारोळे, रोहित कंजे, डॉ. नीता गिरबिडे, डॉ. अरुण जिरवणकर, भीमराव खेबाळे, डॉ.नामदेव पवार, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ. सचिन बगडिया, डॉ. गोपाल कदम, डॉ. इनायतुल्ला खान, वंदना पांचाळ, डॉ. राहुल डोंगरे, डॉ. देवेंद्र जायभाये, राजेंद्र गळगे, प्रशांत तुपकरी, ज्योती पवार, रामा बांगर, दीपक लोखंडे यांचा गौरव आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.