कोरोनाचे नवे ५१ रुग्ण; ७१ जण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:43+5:302021-05-25T04:33:43+5:30

हिंगोली जिल्ह्यात २४ मे रोजी अँटिजन चाचणीत २९७ पैकी १६ जण बाधित आढळून आले आहेत. हिंगोली परिसरात नर्सी नामदेव ...

Corona's 51 new patients; 71 people are healed | कोरोनाचे नवे ५१ रुग्ण; ७१ जण बरे

कोरोनाचे नवे ५१ रुग्ण; ७१ जण बरे

Next

हिंगोली जिल्ह्यात २४ मे रोजी अँटिजन चाचणीत २९७ पैकी १६ जण बाधित आढळून आले आहेत. हिंगोली परिसरात नर्सी नामदेव १, रिसाला बाजार १, जामगव्हाण १ असे तीन रुग्ण आढळले. वसमत परिसरात ३५ पैकी एकही रुग्ण आढळला नाही. सेनगाव परिसरात खैरी घुमट ४, सेनगाव १, सिनगी खांबा १, नागा सिनगी १ असे ७ रुग्ण आढळून आले आहेत. औंढा परिसरात ११ पैकी एकही बाधित नाही. कळमनुरीत ११४ पैकी ६ बाधित आढळले. यात शिवणी २, सालापूर १, शेवाळा १, माळधामणी १, हातमाली १ यांचा समावेश आहे. आरटीपीसीआर चाचणीत भटसावंगी १, न.प. कॉलनी १, अंतुलेनगर १, जिजामातानगर १, पांगरी १, सरस्वतीनगर १, भांडेगाव १, कळमकोंडा बु. १, डिग्रस कऱ्हाळे १ असे हिंगोली परिसरात ९ रुग्ण आढळले. औंढा परिसरात भोसी १, नागेशवाडी १, करंजाळा १, जवळा बाजार १ असे ४ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात कापडसिंगी २, हुडी २, वडहिवरा ६, सावजी बँक १, धुमाळ गल्ली १, साबलखेडा १ असे १३ रुग्ण आढळले. वसमत परिसरात कुरुंदा येथे एक रुग्ण आढळला. आरटीपीसीआर चाचणीत ३६ रुग्ण आढळले.

आज बरे झाल्याने जिल्हा रुग्णालयातून ३२, कळमनुरीतून १६, औंढ्यातून ५, सेनगावातून ३, वसमतमधून ८ तर लिंबाळा येथून ७ रुग्णांना घरी सोडले. एकूण ७१ जण बरे झाले.

आज हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात सेलसुरा येथील ७५ वर्षीय पुरुष व वाढोणा येथील ६२ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १५ हजार ४१६ रुग्ण आढळले. यापैकी १४ हजार ५८५ जण बरे झाले, तर सध्या ४९६ जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत कोरोनाने ३३५ जणांचा मृत्यू झाला. सध्या दाखल असलेल्या रुग्णांपैकी १७० जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर आहेत, तर २६ रुग्ण अतिगंभीर असल्याने बायपॅपवर आहेत.

Web Title: Corona's 51 new patients; 71 people are healed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.