कोरोनाचे नवे आठ रूग्ण; २९ बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:32+5:302021-06-09T04:37:32+5:30
जिल्ह्यात रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये हिंगोली परिसरात १ जण कोरोना बाधित आढळून आला. तसेच आरटीपीसीआर तपासणीत हिंगोली परिसरात ३, सेनगाव ...
जिल्ह्यात रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये हिंगोली परिसरात १ जण कोरोना बाधित आढळून आला. तसेच आरटीपीसीआर तपासणीत हिंगोली परिसरात ३, सेनगाव १, कळमनुरी २ तर वसमत परिसरात एक असे एकूण आठ रूग्ण आढळून आले. दरम्यान, २९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ८२३ रुग्ण आढळले असून त्यापैकी त्यापैकी १५ हजार २९३ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले आहे. आज घडीला जिल्ह्यात एकूण १६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ३६९ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या ६९ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजनवर ठेवले आहे. तर ११ रूग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.