कोरोनाचा नवा एकच रुग्ण; १४ जण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:26+5:302021-06-18T04:21:26+5:30
रॅपिड अँटिजन चाचणीत सेनगावात ६२ पैकी उटी ब्रह्मचारी येथे एक रुग्ण आढळला, तर हिंगोलीत १०१, वसमतला १९, औंढ्यात ५१ ...
रॅपिड अँटिजन चाचणीत सेनगावात ६२ पैकी उटी ब्रह्मचारी येथे एक रुग्ण आढळला, तर हिंगोलीत १०१, वसमतला १९, औंढ्यात ५१ व कळमनुरीत १३३ जणांची चाचणी करूनही कोणी बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीतही हिंगोली परिसरात ३६, औंढ्यात ८२, तर वसमतला ५३ जणांचे अहवाल आले असून, एकही बाधित नाही. आज बरे झाल्याने १४ जणांना घरी सोडण्यात आले. यात सामान्य रुग्णालयातून ९, सेनगावातून २, वसमतहून १, तर कळमनुरीतून दोघांना घरी सोडले.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ८९१ रुग्ण आढळून आले. यापैकी १५ हजार ४५६ जण बरे झाले. सध्या ५६ जणांवर उपचार सुरू आहेत, तर आजपर्यंत ३७९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या दाखल असलेल्यांपैकी ३० जण ऑक्सिजनवर, तर चारजण बायपॅपवर आहेत. त्यामुळे दाखल असलेल्या रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण गंभीर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाचा धोका कायम
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरीही धोका कायम आहे. जे रुग्ण दाखल होत आहेत, त्यापैकी गंभीर रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेसह इतर ठिकाणी कोरोनाचे नियम पाळूनच दैनंदिन व्यवहार करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.