CoronaVirus : हिंगोलीत आणखी ९ कोरोना संशयित; एकूण १७ जणांचे अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 07:17 PM2020-04-09T19:17:10+5:302020-04-09T19:18:45+5:30
यापूर्वीचे ८ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील एका युवकाचा श्वसनाशी संबंधित तीव्र आजाराने मृत्यू झाल्यानंतर खबरदारी म्हणून या युवकाच्या कुटुंबातील ९ जणांना आज जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. काल एका युवतीच्या मृत्यूनंतर दाखल केलेल्या आठ जणांचे अहवालही अजून आले नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर या रुग्णाच्या कुटुंबियांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. त्यांना वसमत येथे क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. हे ९ जण आहेत. काल औंढा तालुक्यातील उखळी येथील एका युवतीचा श्वसनाशी संबंधित आजाराने मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील सहा व इतर दोन अशा आठ जणांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यांचे थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेला पाठविले आहेत. त्यांचे अहवाल अजून प्राप्त झाले नाहीत. दरम्यान, आज जवळा बाजार येथील एकाच कुटुंबातील ९ जणांना दाखल करून घेतले. या घरातील एका युवकाचा औरंगाबाद येथे श्वसनाच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर खबरदारी म्हणून प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. त्यांचेही थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.