CoronaVirus : कौतुकास्पद ! मरणोत्तर विधीचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 05:24 PM2020-04-23T17:24:46+5:302020-04-23T17:25:53+5:30
राठी परिवाराने दुःख बाजूला सारून कोरोना विरुद्ध केली मदत
औंढानागनाथः- शहरामध्ये धोंडुलाल राठी यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास निधन निधन झाले. त्यांच्यावर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी मरणोउपरांत होणार विधीचा खर्च टाळून १ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी गुरूवारी दिला.
धोंडुलाल व शकुंतला राठी यांना प्रभुल्लचंद्र ,डॉ. प्रवीण, प्रसन्नकुमार अशी तीन मुले आहेत. बुधवारी शकुंतला राठी यांचे दुःखद निधन झाले. यावेळी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन त्यांनी अंत्यविधी सोशल डिस्टंन्सिंग नुसार पार पडला. तसेच त्यानंतरचे विविध विधी व कार्यक्रम रद्द करून त्यास लागणारा निधी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी देण्याचे ठरवले. यानुसार राठी कुटुंबीयांनी एक लाख रुपयांचा निधीचा धनादेश आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी श्रीराम राठी, डॉ विलास खरात, डॉ विमल बोरा, श्रीनिवास राठी, राधेशाम राठी सचीन बियाळे सह राठी परिवार उपस्थित होता.